Join us

मध्य रेल्वेवर धावणार 'अंडरस्लंग' एसी लोकल; नवी ऐसपैस एसी लोकल कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:44 IST

1 / 7
मध्य रेल्वेने त्यांच्या ताफ्यात असलेली 'अंडरस्लंग' एसी लोकल वापरात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ही लोकल गेल्या नोव्हेंबरमध्ये रेल्वेला मिळाली होती. तिची चाचणी बाकी असल्याने ती वापरात आणली गेली नव्हती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
2 / 7
जुन्या दोन एसी लोकल देखभाल दुरुस्तीसाठी पाठविण्यात येणार असल्याने ही नवी एसी लोकल आता वापरण्यात येणार आहे.
3 / 7
या लोकलची मोटर डब्याच्या बाहेर बसविलेली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होते. नियमित एसी लोकलमध्ये १,०२८ प्रवाशांसाठी आसन असतात, तर या एसी लोकलमध्ये १,११६ प्रवासी बसू शकतात.
4 / 7
नवीन 'अंडरस्लंग' एसी लोकल सध्या कुर्ला कारशेडमध्ये आहे. लवकरच तिच्या चाचण्या सुरू होतील. त्या पूर्ण झाल्यावर ही लोकल सेवेत येईल.
5 / 7
मध्य रेल्वेचे ट्रॅक बऱ्याच ठिकाणी खोलगट भागांमध्ये • असल्याने नवीन एसी लोकलच्या मोटारीत पाणी शिरून बिघाडाची शक्यता असते. यामुळे ही नवी लोकल अद्याप वापरात आणली नव्हती.
6 / 7
सध्या ताफ्यात असलेल्या एसी लोकलपैकी दोन लोकल नियमित देखभाल-दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे सेवेवर परिणाम होऊ नये यासाठी ही लोकल वापरात आणली जाणार आहे.
7 / 7
नवी लोकल ताफ्यात येणार असली तरी सध्या सेवांमध्ये वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलlocalलोकलcentral railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे