Join us  

Kangana Ranaut : ऑफिस पुन्हा बनेल, परंतु शिवसेनेची 'औकात' सर्वांना माहीत झाली; बबिता फोगाटची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 1:19 PM

1 / 10
शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत ( Kangana Ranaut) यांच्यातील वाद आता शिगेला गेला आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर ( Kangana Ranaut's office) कारवाई सुरू केली आहे. या कारवाईचे फोटो ट्विट करत कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.
2 / 10
कंगनाच्या सपोर्टमध्ये दंगल गर्ल बबिता फोगाटही ( Babita Phogat) मैदानात उतरली आणि तिनं शिवसेनेची 'औकात' काढली...
3 / 10
कंगनानं एका ट्विटमध्ये आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत त्यावर कारवाई करणाऱ्यांची तुलना थेट बाबराशी केली आहे. 'मणिकर्णिका फिल्ममध्ये पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली, त्याचं नाव अयोध्या होतं. त्यामुळे ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही, तर राम मंदिर आहे. आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पाडलं जातं आहे. पण बाबर, तू हे लक्षात ठेव, तिथेच पुन्हा राम मंदिर उभारलं जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम,' असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
4 / 10
तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन, स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर, जेवणासाठी अनधिकृतपणे जागा तयार, जिन्याजवळ आणि तळमजल्याजवळच्या पार्किंग लॉटमध्ये दोन अनधिकृत शौचालये बांधली, पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे केबिन, देवघरातच बैठकीसाठी रूम, स्लॅब टाकून अनधिकृत शौचालय, पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला.
5 / 10
दुसर्‍या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत बदल, बाल्कनीत फेरफार, स्लॅब टाकून मजल्याचा उभा विस्तार, शौचालय तोडून त्या जागेचा इतर गोष्टींसाठी वापर, बाजूच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून स्वत:च्या बंगल्यात सामावून घेतला, बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा बदलली.
6 / 10
कंगनाच्या कार्यालयाबाहेर मंगळवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस लावली. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. अधिनियम ३५४ अ अंतर्गत नोटीस लावण्यात आली होती. या नोटिशीची मुदत २४ तास होती.
7 / 10
कंगनानं कार्यालयात बांधकाम करताना मुंबई महापालिकेच्या अधिनियम ३५४ अ चं उल्लंघन केल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पालिकेच्या नोटिशीत सात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. इमारतीचं बांधकाम पालिकेच्या नियमानुसार झालेलं नाही.
8 / 10
दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचं बांधकाम अनधिकृतपणे करण्यात आलं आहे. नकाशात बेडरुमसोबत शौचालयं दाखवण्यात आलं होतं. कागदपत्रांत शौचालयं दाखवण्यात आलेली जागा प्रत्यक्षात मात्र ये-जा करण्यासाठी वापरण्यात आली आहे, असं पालिकेनं नोटिशीत म्हटलं आहे.
9 / 10
पालिकेच्या कारवाईनंतर भाजपात प्रवेश केलेल्या बबितानं जोरदार टीका केली. तिनं लिहिलं की,''मृत्यू जवळ आला की गिधाड शहराकडे धाव घेतो, शिवसेनेची तशीच अवस्था आहे. कंगना राणौत यांना घाबरणारी नाही. संपूर्ण देश तिच्या पाठीशी आहे. ऑफिस पुन्हा बनवलं जाईल, परंतु शिवसेनेची औकात सर्वांना माहीत पडली. कंगना तू घाबरू नकोस, संपूर्ण देश तुझ्यासोबत उभा आहे.''
10 / 10
पालिकेच्या कारवाईनंतर भाजपात प्रवेश केलेल्या बबितानं जोरदार टीका केली. तिनं लिहिलं की,''मृत्यू जवळ आला की गिधाड शहराकडे धाव घेतो, शिवसेनेची तशीच अवस्था आहे. कंगना राणौत यांना घाबरणारी नाही. संपूर्ण देश तिच्या पाठीशी आहे. ऑफिस पुन्हा बनवलं जाईल, परंतु शिवसेनेची औकात सर्वांना माहीत पडली. कंगना तू घाबरू नकोस, संपूर्ण देश तुझ्यासोबत उभा आहे.''
टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBabita Kumari Phogatबबिता फोगाट