बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या मुलांमधील अंतर वाचून थक्क व्हाल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 20:37 IST
1 / 5बॉलिवूडमध्ये अनेक नाती पाहायला मिळतात. त्यातील काहींच्या सावत्र आई आणि मुलांच्या वयात फारसा फरक नाही. अशी अनेक उदाहरणं बॉलिवूडमध्ये आहेत. करिना कपूर खान आणि सैफ अली खानच्या पहिल्या बायकोची मुलगी सारा अली खान यांच्यात फक्त 13 वर्षांचा फरक आहे. 2 / 5तसेच हेमा मालिनी आणि सनी देओलच्या वयातही जास्त काही अंतर नाही. हेमा मालिनी जिथे 69 वर्षांची आहे, तर सनी देओल हा 61 वर्षांचा आहे. या दोघांमध्ये फक्त 8 वर्षांचा फरक आहे. 3 / 5तर महेश भट्ट यांची पत्नी सोनी राजदान आणि पूजा भट्ट यांच्यातही फक्त 16 वर्षांचा फरक आहे. 4 / 5संजय दत्तची बायको मान्यता दत्त आणि त्याची मुलगी त्रिशाला दत्ता यांच्यातही फक्त 9 वर्षांचं अंतर आहे. 5 / 5कबिर बेदीची पत्नी परवीन दुसांज हिचं वय 42 वर्ष आहे. तर त्यांची मुलगी पूजा बेदीचं वय 47 वर्षं आहे. त्याच्यात फक्त 5 वर्षांचा फरक आहे.