Join us  

उभा पांडुरंग विटेवरी... १६ विटा अन् माऊलीची १६ मनमोहकं रुपं; मराठमोळ्या कलाकाराची किमया, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 12:27 PM

1 / 8
आषाढी एकादशीच्या निमित्तानं देवगडमधील अक्षय मेस्त्री या मराठमोळ्या कलाकारानं चित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक भान जपत १६ विटांवर विठुरायाची रुपं साकारली आहेत.
2 / 8
अक्षयनं ५ जुलैपासून प्रत्येक विटेवर विठूरायाचे आकर्षक चित्र रेखाटण्यास सुरुवात केली होती.
3 / 8
सिंधुदुर्गातील देवगडमधील माऊली भक्तांना पुढील काही दिवस अक्षय मेस्त्री याची कला पाहता येणार आहे. वेगवेगळ्या वेषभूषेतील पांडुरंग भक्तांना पाहता येणार आहे.
4 / 8
अक्षय मेस्त्री दरवर्षी आपल्या कलेच्या माध्यमातून विविध पद्धतीनं विठुरायाचं दर्शन घडविण्याचा प्रयत्न करत असतो. मागील वर्षी तुळशीच्या इवल्याशा पानावर अप्रतिम विठ्ठलाचे चित्र, शिवाय दीड एकर क्षेत्रात पॉवर ट्रीलरच्या साहाय्याने साकारलेला भव्यदिव्य पांडुरंग अख्या महाराष्ट्राने पाहिला होता.
5 / 8
विटेवर साकारण्यात आलेल्या विठ्ठलाच्या चित्रासाठी दररोज अर्धा तास वेळ दिला जात असे. भविष्यात या विटा प्रदर्शनात मांडणार असल्याचा मानस अक्षय याचा आहे
6 / 8
अक्षय सध्या 'कोकण रात्र' कोकणातील प्रतिबिंबित होणारी रात्र आणि गड किल्ले संवर्धनासाठी साद घालणारी ' हाक अस्मितेची' हे दोन महत्वपूर्ण उपक्रम घेऊन त्यावर तो अभ्यास करतोय.
7 / 8
अक्षयनं विटेवर साकारलेली विठू माऊलीची रुपं खरंच मनमोहून टाकणारी आहेत.
8 / 8
कोरोनामुळे पायीवारी माऊलीच्या भक्तांना करता येत नसली तरी आपल्यातील कलेच्या माध्यमातून कलाकार विविध माध्यमातून विठुमाऊलीचं रुप सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत. यातून एका आगळ्यावेगळ्या भक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूरSocial Viralसोशल व्हायरल