By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 15:19 IST
1 / 5लष्करामार्फत आंबिवली, एल्फिन्स्टन-परळ पादचारी पूल उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर, रविवारी करी रोड येथेही लष्कराने यशस्वीपणे पूल उभारला. 2 / 5११ टप्प्यांमध्ये करी रोड येथील पूल उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले. 3 / 5करी रोड येथील मोठ्या प्रमाणातील लोकल-एक्स्प्रेस यांची वाहतूक, मर्यादित जागा आणि वेळ, पुलाच्या बांधकामांचे साहित्य आणि मशिनरी यांची व्यवस्था अशी विविध आव्हाने या ठिकाणी होती. 4 / 5मात्र, लष्कराने सुनियोजन, पूर्वतयारी यांच्या मदतीने आव्हाने पार केली. यासाठी लष्कराने आधुनिक पद्धतीने पुलाची बांधणी केली. तिन्ही ठिकाणी ३५० टन वजनी क्षमता असलेल्या क्रेनचा वापर करण्यात आला. 5 / 5सध्या पूल उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. केवळ पायºया आणि छताचे काम बाकी आहे. १० ते १५ दिवसांत करी रोड लष्करी पादचारी पुलाच्या पायºयांचे आणि छताचे काम पूर्ण करण्यात येईल.