All is Well.... अमृता फडणवीसांकडून देवेंद्रांचं स्वागत, सर्वांना धन्यवाद
By महेश गलांडे | Updated: November 4, 2020 19:49 IST
1 / 10विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सेंट जॉर्ज रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 24 ऑक्टोबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. 2 / 10लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. 3 / 10डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी ! असे आवाहन फडणवीस यांनी केले होते.4 / 10देवेंद्र फडणवीस हे बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रभारी म्हणून काम पाहत होते. मात्र, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांनी तीन दिवस महाराष्ट्राचा दौरा केला. त्यामध्ये, राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या5 / 10फडणवीस यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले. रविवारी २०० मिली तर सोमवारी सायंकाळी तेवढाच प्लाज्मा देण्यात आला होता. त्यांची ऑक्सिजनची पातळी किंचित कमी झाल्याने त्यांना काही स्टेरॉईडस् आणि रेमडेसीवरही देण्यात आले होते6 / 10उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. ते मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी प्रकृती ठीक असल्याचे सांगितले होते. गेल्या 8 दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली आहे7 / 10देवेंद्र फडणवीस यांनी आज रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. त्यावेळी, भाजपाचे प्रमुख नेते त्यांच्या स्वागतला हजर होते. तर, अमृता फडणवीस यांनीही औक्षण करुन त्यांचं स्वागत केलं 8 / 10रुग्णालयातून आज घरी परतलो. सेंट जॉर्ज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि इतरही सर्व कर्मचारी वृंद यांचा, त्यांनी केलेले सहाय्य, घेतलेली काळजी, उपचार यासाठी मी अत्यंत आभारी आहे9 / 10मला लवकर बरे वाटावे, यासाठी ज्यांनी सदिच्छा दिल्या, त्यांचेही अनंत आभार!, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे. फडणवीसांनी ट्विटवरुन सर्वांचे आभार मानले आहेत. 10 / 10अमृता फडणवीस यांनी देवेंद्र यांच्या स्वागताचं ट्विट केलंय. औक्षण करतानाचे फोटो शेअर करत अमृता यांनी ऑल इज वेल असं म्हटलं आहे.