जि.प. निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची धावपळ
By Admin | Updated: November 21, 2014 23:01 IST2014-11-21T23:01:38+5:302014-11-21T23:01:38+5:30
आताच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, पालघर व तलासरी या जि.प.च्या जागा पूर्वी ठाणे जिल्ह्यात होत्या

जि.प. निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची धावपळ
वसई : आताच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, पालघर व तलासरी या जि.प.च्या जागा पूर्वी ठाणे जिल्ह्यात होत्या. त्यामध्ये राष्ट्रवादी - ८, काँग्रेस - १, शिवसेना - ८, जनआंदोलन समिती - ३, भाजपा - ६, बहुजन विकास आघाडी - ३ व अपक्ष २ असे बलाबल होते. यंदा पालघर जिल्ह्णात वाडा तालुक्याचा समावेश झाल्यामुळे जिल्हापरिषदांच्या जागातही वाढ झाली आहे. एकुण ५७ गट व ११४ गणासाठी येत्या जानेवारीत निवडणुका होण्याची शक्यता आहे.
गेल्यावेळी झालेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीत विक्रमगड व डहाणू - राष्ट्रवादी काँग्रेस, पालघर व मोखाडा - शिवसेना, जव्हार - भाजपा व तलासरी - मार्क्स. कम्यु. असे वर्चस्व होते. यंदा पंचायत समित्यांच्या गणातही लक्षणीय वाढ झाली आहे. एकू ण ११४ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने आता सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. आरक्षणासंदर्भातील हरकती व सूचना आल्यानंतर त्यावर निर्णय होऊन मग निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु या निवडणुका जानेवारी महिन्यात होतील असे गृहीत धरून राजकीय पक्षांनी आरक्षणानुसार उमेदवार शोधणे, जातीचे दाखले मिळवणे इ. कामांना सुरूवात केली आहे. (प्रतिनिधी)