Maharashtra ZP Panchayat Samiti Election 2026 Date: मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदे घेऊन याबाबत घोषणा केली. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. जिल्हा परिषेदेच्या निवडणुकीसाठी १६ जानेवारी २०२६ रोजी सूचनेचे प्रकाशन होणार आहे. अर्ज दाखल करण्याची दाखल १६ जानेवारी ते २१ जानेवारी अशी मुदत असणार आहे. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत २७ जानेवारी २०२६ तर अंतिम उमेदवारी व निवडणूक चिन्ह वाटप २७ जानेवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत असणार आहे. मतदानाचा दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ सकाळी ६.३० ते सायंकाळी ५.३० मतमोजणीचा दिनांक ७ फेब्रुवारी होणार आहे.
या निवडणुकांसाठी १ जुलैची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी २५ हजार ४८२ मतदान केंद्र असमार आहेत. तसेच १ लाख १० हजार ३२९ बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे.
या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेसाठी निवडणूक होणार आहे . तसेच पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर , छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्हा परिषदांसाठीही निवडणूक होणार आहे. तर मतदानाच्या २४ तास आधी प्रचाराची सांगता होणार आहे.
निवडणुकीचा असा कार्यक्रम असणार
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६नामनिर्देशन पत्राची छाननी - २२ जानेवारी २०२६उमेदवारी माघारीची अंतिम मुदत - २७ जानेवारी २०२६ दुपारी ३ पर्यंतअंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप - २७ जानेवारी २०२६ दुपारी ३.३० नंतरअंतिम उमेदवारांची यादी - २७ जानेवारी २०२६ मतदानाचा दिनांक - ५ फेब्रुवारी २०२६ - सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतमोजणी - ७ फेब्रुवारी २०२६ - सकाळी १० वाजल्यापासून
Web Summary : Maharashtra's election commission announced elections for 12 Zilla Parishads and 125 Panchayat Samitis. Voting is scheduled for February 5, 2026, with results on February 7. The election will use the voter list from July 1 and have 25,482 polling stations.
Web Summary : महाराष्ट्र चुनाव आयोग ने 12 जिला परिषदों और 125 पंचायत समितियों के चुनाव की घोषणा की। मतदान 5 फरवरी, 2026 को होगा, परिणाम 7 फरवरी को। चुनाव में 1 जुलाई की मतदाता सूची का उपयोग किया जाएगा और 25,482 मतदान केंद्र होंगे।