Join us

अँटिबायोटिक कोर्स पूर्ण करण्यासाठी ५.६९ लाख लोकांची प्रतिज्ञा; ZIFI-FDCची गिनीज बुकात नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 15:23 IST

सध्या जगभरातील डॉक्टर प्रतिजैविक प्रतिकार समस्येचा सामना करत आहेत

मुंबई: एँटिबायोटिक कोर्स पूर्ण करण्याच्या आरोग्य मोहिमेसाठी सर्वाधिक संकल्प करण्याच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झेडआयएफआय-एफडीसीनं केली आहे. सध्या जगभरातील डॉक्टर प्रतिजैविक प्रतिकार समस्येचा सामना करत आहेत. प्रतिजैविक प्रतिकार समस्येवर मात करण्यासाठी झेडआयएफआय-एफडीसीनं पुढाकार घेत संकल्प अभियानाची सुरुवात केली होती. या मोहिमेच्या अंतर्गत प्रतिजैविक थेरपी पूर्ण करण्याची शपथ रुग्ण, डॉक्टर, रुग्णालय आणि औषधांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतली.

संकल्प अभियानातून तब्बल ५.६९ लाख लोकांनी प्रतिजैविक थेरपी पूर्ण करण्याची शपथ घेतली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून या अभियानाचं परीक्षण करण्यात आलं. अशा प्रकारच्या अभियानाला आतापर्यंत कधीही इतक्या मोठ्या संख्येनं लोकसहभाग लाभला नव्हता. त्यामुळे या अभियानाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉडमध्ये करण्यात आली.

टॅग्स :गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड