Join us
Daily Top 2Weekly Top 5

झवेरी बाजारातील व्यापाऱ्याची ९३ किलो चांदी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:30 IST

झवेरी बाजारातील व्यापाºयाची ९३ किलो चांदी चोरीला गेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मुंबई : झवेरी बाजारातील व्यापाºयाची ९३ किलो चांदी चोरीला गेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली आहे.घाटकोपर पूर्वेत राहणारे मनीष जैन (४०) यांचा झवेरी बाजारात चांदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी कोल्हापूरहून मागवलेली ३७ लाख रुपयांची ९३ किलो चांदी शनिवारी दुकानातील कपाटात ठेवली आणि कार्यालय बंद करून ते घरी गेले. रविवारी सुट्टी असल्याने दुकान बंद होते. सोमवारी रात्री कामगार अमर आगे्रकडून त्यांना चोरी झाल्याचे समजले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात रविवारी एक तरुण सीसीटीव्हीची दिशा बदलत असताना दिसला. तो त्यांच्याच कामगार करन बिश्नोई होता. तीन महिन्यांपासून तो कामावर येत नव्हता. त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली.

टॅग्स :गुन्हामुंबई