Join us
Daily Top 2Weekly Top 5

युवासेनेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 20:35 IST

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पूर व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी केली. 

मुंबई- युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पूर व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी केली. 

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे तसेच त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचे या वर्षीचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी नम्र विनंती यावेळी युवासेनेच्या शिष्टमंडळाने  राज्यपालांना केली. महाराष्ट्रात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क भरणे कठीण झाले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून युवासेनेच्या मागणीवर कार्यवाही करण्याची विनंती यावेळी राज्यपालांना केली.