Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगावात युवा महाराष्ट्राभिमान मेळावा, आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 11, 2024 17:09 IST

अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी युवा सैनिक मेळावा रविवार दि १४ एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता गोरेगाव पश्चिम एम.जी. रोड येथील आझाद मैदानात आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई- लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लढा देत आहेत.सत्ता कारणासाठी आपल्या वडिलांवर पाठीमागून केलेला वार, आणि आजोबांनी स्थापन केलेली महाराष्ट्र हितासाठी उभारलेल्या शिवसेना संघटनेला पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली आहे.

शिवसैनिकांचा विश्वास सोबत घेऊन लढणारे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी युवा सैनिक मेळावा रविवार दि १४ एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता गोरेगाव पश्चिम एम.जी. रोड येथील आझाद मैदानात आयोजित करण्यात आला आहे.

अमोल कीर्तिकर यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्यासाठी शिवसेना संघटने बरोबर कार्यरत असलेला शिवसैनिक ईर्षेने पेटून उठला आहे. आपल्या घरातील मुला- मुलींना देखील युवासेनेेत सहभागी करून घ्या. उद्याच्या भविष्यकाळात मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठीचे आस्तित्व टिकवायचे असेल तर युवा सक्षम झालाच पाहिजे असे आवाहन करून विभागातील तरूण - तरूणींना या मेळाव्यासाठी निमंत्रित केले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबईलोकसभा निवडणूक २०२४