तरुणाईला वेध ‘डे’चे
By Admin | Updated: November 10, 2014 22:31 IST2014-11-10T22:31:57+5:302014-11-10T22:31:57+5:30
बघता-बघता दिवाळी संपली. थंडीने धुक्याची दुलई पांघरायला सुरुवात केली. दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा कॉलेज कट्टे आणि कॅम्पस गप्पांनी गजबजू लागले.

तरुणाईला वेध ‘डे’चे
बघता-बघता दिवाळी संपली. थंडीने धुक्याची दुलई पांघरायला सुरुवात केली. दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा कॉलेज कट्टे आणि कॅम्पस गप्पांनी गजबजू लागले. या सुट्टीत सगळ्यांनीच फ्रेंडस ना मिस केले आहे. त्यामुळे आता पुन्हा सगळे भेटल्यावर सध्या कटटय़ांवर आणि ग्रुप्समध्ये फक्त कॉलेजच्या आगामी फेस्टिव्हल आणि डे यांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ‘कॉलेज डे इज फन डे’, इमोशन, कलर्स आणि एन्जॉय असा सगळा फ्यूजनचा प्रकार असतो. अभ्यासाबरोबरच आपला फेस्ट कसा चांगला होईल, यासाठी वेगवेगळे प्लॅनिंग कटटय़ावर केले जात आहेत. काय वाटते कॉलेजच्या तरुण-तरुणींना, चला तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊ या..
स्मृती सावंत
ही प्रगती महाविद्यालयात बीएमएसचे शिक्षण घेते. तिच्या मते दिवाळीनंतर कॉलेजमध्ये डे सेलिब्रेशन सुरू होईल. डे सेलिब्रेशन म्हणजे कॉलेज जीवनातील फन प्लॅन आहे, असे मला वाटते. यात सारी डे, ट्रॅडिशनल ड्रेस डे अशा विविध डें चा समावेश आहे. सारी डे च्या निमित्ताने कॉलेजमध्ये पारंपरिक वेशभूषेत येण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यासाठीच आमच्या ग्रुपची तयारी सुरू झाली आहे. कॉलेज, क्लास यामुळे किचनकडे एरव्ही मी फारशी वळत नाही. पण, दिवाळीच्या सुटीत फराळ तयार करण्यासाठी आईला मदत केली होती. करंज्या कशा करायच्या, हे मी यंदा प्रथमच शिकले. स्वत: तयार केलेले पदार्थ खाताना वेगळीच मजा येते. अनेक मित्र-मैत्रिणी दिवाळी त्यांच्या रिलेटिव्हबरोबर एन्जॉयमेंट करीत होते. त्यामुळे दिवाळी घरच्यांसोबत साजरी केली. सुटीवरून अनेक जण परतले नसले तरी आम्ही डे चे प्लानिंग करायला सुरुवात केली आहे. ऑल डे आणि कॉलेज डे यात बराच फरक असतो. आमच्या ग्रुपला डे साजरे करण्यात खूप मजा येते. सॉलीड सेलिब्रेशन करण्याकडे आमचा कल असतो.
पेंढरकर कॉलेजचा प्रतीक नवघरे हा टीवायबीएला आहे. इलेक्शनमुळे त्याच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या होत्या. त्या आता 5 नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत. परीक्षेच्या अभ्यासासोबत डे ची एक्साइटमेंट आहे. दिवाळीच्या आधीच परीक्षा आटोपली असती तर आता डे मध्ये काय करायचे, याचे प्लानिंग करता आले असते. टीवायबीए करतानाच प्रतीक ज्युदो खेळतो. परीक्षेमुळे ज्युदोच्या प्रॅक्टिसला कमी वेळ द्यावा लागत आहे. खेळ, परीक्षा आणि डे या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी फन पॉइंट म्हटलं की, डे हे मला खूप आवडतात. त्यात मी मोठय़ा उत्साहाने सहभागी होतो.
मंजुनाथ कॉलेजमध्ये अकरावीला असलेली सभ्या मालरे हिने सांगितले की, दिवाळीत आईला घरात फराळ करण्यासाठी मदत केली. आकाशकंदील, फटाके यांची सगळी मजा घेतली. डिसेंबर महिना कॉलेज फेस्टिव्हलच्या भरगच्च कार्यक्रमांचा असतो. डे साजरा करण्यात मला जास्त आनंद आहे. सगळ्यांनी ठरवून ड्रेसिंग करणो व त्यातील विविधता ही पर्सनॅलिटीचा लूक बदलणारी ठरते. अनेकांना कोणते कपडे सूट होतात, हे देखील यातून समजते. या डे ना काढलेले फोटो व्हॉट्सअॅपवर शेअर केले जातात. सध्या सेल्फीचा जमाना असल्याने डे चा आनंद यंगस्टर्स सेल्फीतून वन सेंकदात शेअर करू शकतात. यंदा आम्ही अकरावीला असल्याने प्रथमच कॉलेजमधील डे चा आनंद लुटणार आहोत. त्यामुळे या डे विषयी एक्साइटमेंट खूप आहे.
पेंढरकर महाविद्यालयातील ओजस्वी कुलकर्णी ही सायन्सला शिकते. कॉलेज आजपासून सुरू झाले आहे. सुटीनंतर परतल्यावर मित्र-मैत्रिणींसोबत पुन्हा सेट होणो, त्यानंतर डे कशा प्रकारे साजरे केले जाणार आहेत, याकडे लक्ष ठेवून फ्रेण्ड्ससोबत चर्चा करण्यात आजचा पहिला दिवस गेला. दिवाळी फेस्टिव्हलप्रमाणोच कॉलेज फेस्टिव्हल मला महत्त्वाचा वाटतो. कारण, फेस्टिव्हलमधून यंगस्टर्सच्या इमोशनला वेगळी वाट मिळते. केवळ एन्जॉयमेंट नसून त्यातूनही अभ्यासालाही एनर्जी मिळते. याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात, असे मला वाटते. पुढच्या महिन्यात अॅन्युअल फंक्शन असेल. त्यासाठी महाविद्यालयाकडून काय थीम मिळेल, याकडे लक्ष लागले आहे. कॉलेजमधील विविध डे बाबत इतके दिवस केवळ मित्र-मैत्रिणींकडून ऐकत होते. आता ते प्रत्यक्ष अनुभवताना खूप आनंद होत आहे.
कॉलेजच्या कट्टय़ावरची धम्माल, ‘ती’ कॉलेजमध्ये कधी येईल यासाठी तासनतास गेटकडे डोळे लावून बसणं, कॉलेजमधल्या ‘मामा’सोबतची आपली दोस्ती, मित्रंबरोबर बंक केलेली लेक्चर्स, त्यासाठी प्रोफेसरांना दिलेली खोटी कारणं, मित्रंनीही केलेली प्रॉक्सीची मदत.. असे मौज आणि मस्तीने भरलेले ते कॉलेजचे क्षण.. या आणि अशा तुमच्या धम्माल गोष्टी शेअर करण्यासाठी ‘लोकमत’ने स्पेशली तुमच्यासाठी आणलाय हक्काचा प्लॅटफॉर्म.. पाठवा तुमच्या हटके आठवणी ’‘ें3ूेंस्र42ॅें्र’.ूे या ई-मेल आयडीवर.