तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: April 27, 2017 00:24 IST2017-04-27T00:24:24+5:302017-04-27T00:24:24+5:30
आजारातून सुटका होत नसल्याने, निराश झालेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी चेंबूर येथे घडली.

तरुणाची आत्महत्या
मुंबई : आजारातून सुटका होत नसल्याने, निराश झालेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी चेंबूर येथे घडली. याबाबत गोवंडी पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे. प्रवीण पवार (३५) असे या तरुणाचे नाव असून, तो चेंबूरच्या खारदेवनगर परिसरातील पालिका वसाहतीत कुटुंबीयांसह राहात होता. अनेक वर्षांपासून त्याला आजाराने ग्रासले होते. उपचार करूनदेखील काहीही फरक पडत नसल्याने त्याने गळफास आत्महत्या केली. (प्रतिनिधी)