‘मी तर कपडे काढून व्यायाम करत होतो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 02:10 IST2017-07-26T02:10:38+5:302017-07-26T02:10:40+5:30

youth takes out clothes and exercises | ‘मी तर कपडे काढून व्यायाम करत होतो’!

‘मी तर कपडे काढून व्यायाम करत होतो’!

मुंबई : इमारतीच्या टेरेसवर उभे राहून एक तरुण अश्लील चाळे करण्याचा प्रकार ओशिवरा परिसरात दोन दिवसांपूर्वी घडला होता. त्याची क्लिप एका तरुणीने काढून या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्याच्या मुसक्या आवळण्यात ओशिवरा पोलिसांना सोमवारी रात्री यश आले. पण या तरुणाने कपडे काढून व्यायाम करत असल्याचा जबाब नोंदवला.
ओवैस युसूफ शेख (२०) असे अटक करण्यात आलेल्या या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो ओशिवरा पोलिसांच्या हद्दीत असलेल्या पाटलीपुत्र इमारतीत राहतो. दोन दिवसांपूर्वी तो त्याच्या इमारतीच्या टेरेसवर गेला आणि कपडे काढून त्याने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. ही बाब सहाव्या मजल्यावर असलेल्या एका तरुणीने पाहिली आणि तिने मोबाइलमध्ये त्याची क्लिप तयार केली. त्यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात जाऊन तिने हा सगळा प्रकार सांगितला. तसेच त्याच्या विरोधात तक्रारही दाखल केली. मात्र हा प्रकार केल्यानंतर शेख पसार झाला होता. तो सोमवारी रात्री ओशिवरा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या वृत्ताला ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी दुजोरा दिला आहे. शेखने जबाबात कपडे काढून मी व्यायाम करत होतो, असे पोलिसांना सांगितले आहे. मात्र तक्रारदार तरुणीने पोलिसांना दिलेल्या क्लिपमध्ये मात्र तो अश्लील चाळे करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. मात्र नंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याचेही खानविलकर यांनी नमूद केले. 

Web Title: youth takes out clothes and exercises