जुहू समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या तरुणाला वाचवले
By मनोहर कुंभेजकर | Updated: July 22, 2024 21:27 IST2024-07-22T21:26:51+5:302024-07-22T21:27:00+5:30
Mumbai News: जुहू समुद्रकिनाऱ्यावर आज सायंकाळी ७ वाजता बुडणाऱ्या तरुणाला वाचवण्यात येथील जीवरक्षकांना यश आले आहे.

जुहू समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या तरुणाला वाचवले
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - जुहू समुद्रकिनाऱ्यावर आज सायंकाळी ७ वाजता बुडणाऱ्या तरुणाला वाचवण्यात येथील जीवरक्षकांना यश आले आहे. याबाबत येथील जीवरक्षकांनी दिलेल्या माहिती नुसार रवीकुमार पासवान ( २५ ) हा अंधेरी पूर्व साकीनाका येथे राहतो.विशेष म्हणजे मद्यपान करून हा तरुण पाण्यात उतरला होता.लाटांनी त्याला आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले.
सदर घटना येथील जीवरक्षक मनोहर शेट्टी,सोहेल मुलाणी, विघ्नेश मेहर, आदित्य तांडेल यांच्या लक्षात आली.त्यांनी पाण्यात सूर मारत या तरुणाला बाहेर काढले. त्यावेळी तो बेशुद्ध होता.नंतर काही वेळाने त्याला शुद्ध आली. आम्ही त्याला सांताक्रूझ पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे जीवरक्षक मनोहर शेट्टी यांनी सांगितले.
गेल्या ८ ते १० दिवसातील जुहू बीच वर बुडणाऱ्यांना जीवरक्षकांनी वाचवण्याची तिसरी घटना आहे. समुद्र खवळलेला असल्याने पर्यटकांनी विशेषतः तरुणांनी पाण्यात उतरू नये अशी विनंती शेट्टी यांनी केली.