Join us

धक्कादायक! क्रिकेट सामन्यादरम्यान तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 11:22 IST

24 वर्षीय वैभव केसरकरच्या अकाली मृत्यूनं हळहळ

मुंबई: क्रिकेट सामन्यादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भांडूपमध्ये घडली आहे. वैभव केसरकर असं मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. क्रिकेट खेळताना वैभवच्या छातीत दुखू लागल्यानं त्यानं मैदान सोडलं. यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भांडूपमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान 24 वर्षीय वैभव केसरकरचा मृत्यू झाला. वैभव गावदेवी संघाकडून क्रिकेट सामना खेळत होता. या सामन्यात गावदेवी संघानं प्रथम फलंदाजी केली. वैभव जवळपास तीन षटकं फलंदाजी करत होता. यानंतर तो संघासह क्षेत्ररक्षणाला उतरला. मात्र छातीत दुखू लागल्यानं त्याला त्रास होऊ लागला. याची माहिती त्यानं पंचांना दिली. यानंतर त्यानं मैदान सोडलं. त्याच्या मित्रांनी त्याला जवळच्या भाऊसाहेब रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान वैभवचा मृत्यू झाला. वैभवच्या अकाली निधनानं त्याच्या मित्रपरिवाराकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबई