चेंबूरमध्ये चालत्या बसमध्ये चिमुरडीशी अश्लील चाळे, एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 14:32 IST2017-08-27T02:01:25+5:302017-08-27T14:32:01+5:30

चेंबूरमध्ये चालत्या बसमध्ये सहप्रवाशाने शेजारी बसलेल्या ७ वर्षांच्या चिमुरडीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना घडली. या प्रकरणी संतोषकुमार मिश्रा (३६) याला विनयभंग आणि पॉक्सोअंतर्गत अटक करण्यात आली आहे.

 A young man was caught in a moving bus in a bus | चेंबूरमध्ये चालत्या बसमध्ये चिमुरडीशी अश्लील चाळे, एकाला अटक

चेंबूरमध्ये चालत्या बसमध्ये चिमुरडीशी अश्लील चाळे, एकाला अटक

मुंबई : चेंबूरमध्ये चालत्या बसमध्ये सहप्रवाशाने शेजारी बसलेल्या ७ वर्षांच्या चिमुरडीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना घडली. या प्रकरणी संतोषकुमार मिश्रा (३६) याला विनयभंग आणि पॉक्सोअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
चेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर परिसरात ७ वर्षांची नेहा (नावाय बदल) कुटुंबीयांसोबत राहते. बुधवारी दुपारी ३च्या सुमारास ती आईसोबत बसने प्रवास करत होती. त्याच दरम्यान गर्दीचा फायदा घेत, तिच्या शेजारी बसलेल्या सहप्रवाशाने नेहासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. ही बाब तिच्या आईला समजताच, तिने अन्य प्रवाशांना याबाबत सांगितले. प्रवाशांनी मिश्राला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरसी मार्गावरून जाताना ही घटना घडली. घटना लक्षात येताच नेहाच्या आईने वाटेतच बस थांबविली. इतर प्रवासी आरोपीच्या अंगावर धावून गेल्याने बसमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घडलेल्या घटनेमुळे नेहा घाबरली असून तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन चेंबूर पोलिसांनी मिश्राला अटक केली आहे.

अत्याचाराचे सत्र सुरूच
अल्पवयीन मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांकडून जागृती करण्यात येत आहे, तरीदेखील या घटना थांबविण्यास त्यांना यश आलेले नाही. गेल्या ७ महिन्यांत २४४ अल्पवयीन मुली लैंगिक अत्याचाराच्या शिकार ठरल्या, तर ७६८ मुलींचे अपहरण झाले. यापैकी २१३ मुली अजूनही बेपत्ता आहेत.

Web Title:  A young man was caught in a moving bus in a bus