‘अथर्वचा राजा’च्या सेवेत तरुणाई

By Admin | Updated: September 5, 2014 01:31 IST2014-09-05T01:31:41+5:302014-09-05T01:31:41+5:30

इंजिनीअरिंग कॉलेज म्हटले की डोळ्यासमोर येतात ते सतत अभ्यासात बुडालेले विद्यार्थी. या मुलांचा संस्कृती-परंपरेशी दूरदूर्पयत संबंध नसतो असा सर्वसाधारण समज असतो.

Young man in the service of 'King of Atharva' | ‘अथर्वचा राजा’च्या सेवेत तरुणाई

‘अथर्वचा राजा’च्या सेवेत तरुणाई

सायली कडू -मालाड
इंजिनीअरिंग कॉलेज म्हटले की डोळ्यासमोर येतात ते सतत अभ्यासात बुडालेले विद्यार्थी. या मुलांचा संस्कृती-परंपरेशी दूरदूर्पयत संबंध नसतो असा सर्वसाधारण समज असतो. मात्र हीच चौकट तोडून मालाड येथील अथर्व इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये गणराय विराजमान झालेत. याच ‘अथर्वचा राजा’च्या सेवेत ही तरुणाई दंग झाली आहे.
गेल्या 14 वर्षापासून अथर्व कॉलेजमध्ये गणरायाची स्थापना केली जात आहे. तंत्रज्ञानात अथर्व महाविद्यालय अग्रेसर असले तरीही संस्कृतीचे जतन करण्यातही कॉलेज मागे नाही. ज्याच्या नावातच ‘अथर्व’ आहे, तेथे गणरायाची स्थापना होणो गरजेचे आहे, असे मत अथर्व कॉलेजचे अध्यक्ष सुनील राणो यांनी व्यक्त केले. तसेच अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्याची संस्कृतीशी नाळ जोडली गेली पाहिजे याच उद्देशाने विद्याथ्र्याना  गणरायाच्या स्थापनेत संपूर्ण पाठिंबा व्यवस्थापक मंडळाकडून देण्यात येतो, असेही राणो यांनी सांगितले.
‘अथर्वचा राजा’ दिवसेंदिवस प्रसिद्धी मिळवत आहे. दरवर्षी येथे येणा:या भाविकांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे बाप्पाच्या संपूर्ण कार्यात ही तरुण मंडळी समरसून काम करताना दिसते. महिनाभर कॉलेजमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मंडप उभारण्यापासून सजावट, प्रसाद, महाप्रसाद, भाविकांच्या दर्शनासाठी रांगा, सुरक्षेची जबाबदारी हे विद्यार्थीच पार पाडत आहेत. अगदी पारंपरिक पद्धतीने पुणोरी ढोलच्या गजरात ‘अथर्वचा राजा’चे आगमन झाले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे यापैकी ब:याच जणांच्या घरी किंवा सोसायटीतही गणपतीचे आगमन झाले आहे. तरीही हे विद्यार्थी सात दिवस कॉलेजमध्येच थांबून बाप्पाची सेवा करत आहेत. याबाबत कॉलेजचा जनरल सेक्रेटरी आशुतोष कड्डी म्हणतो, ‘माङयाही घरी दीड दिवसाचा गणपती बसतो. मात्र यंदाचे माङो हे शेवटचे वर्ष असल्याने कॉलेजमध्येच थांबलो होतो. मी घरचा गणपतीसुद्धा आणायला गेलो नाही. कॉलेजमधला ‘अथर्वचा राजा’ हाच माङया घरचा बाप्पा आहे, असे मी मानतो. कारण चार वर्षे ज्या कॉलेजमध्ये घालवली आहेत तेही माङो घरच झाले आहे.’
बाप्पाची मूर्ती साडेतीन फुटांची असून संपूर्ण देखावा हा इकोफ्रेंडली पद्धतीने तयार करण्यात आला आहे. सिमेंट कॉँक्रीटच्या जंगलात आपले खरे वैभव म्हणजेच आपला निसर्ग विसरत चाललो आहोत या भावनेने विद्याथ्र्यानी जंगल, झाडा-झुडपांचा देखावा तयार केला आहे. तोसुद्धा कागदाचा लगदा आणि टिश्यू पेपर वापरून.  विद्याथ्र्यानी लाकडाच्या भुशापासून ‘जाणता राजा’ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 12 बाय 12 फूट भव्य रांगोळीसुद्धा काढली आहे. सर्वाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरण्यात ही मंडळी मागे नाहीत. सात दिवसांच्या या गणपतीच्या काळात कॉलेजमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 
गणपतीच्या सेवक मंडळातील उत्साही कार्यकर्ता यश वेस्वीकर म्हणतो, ‘आम्ही सर्व विद्यार्थी अभ्यास सांभाळून हे सर्व काम करत असतो. यामध्ये मुले आणि मुलींचाही मोठा सहभाग असतो. कोणतेही काम करताना लहान की मोठे असा फरक न करता पडेल ते काम करण्याची तयारी आम्हा सर्व मुलांची असते.’
 

 

Web Title: Young man in the service of 'King of Atharva'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.