तरुणाने घरीच साकारला शाडूचा बाप्पा, कोरोनाकाळात यू-ट्यूबवरून घेतले प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:06 IST2021-09-18T04:06:43+5:302021-09-18T04:06:43+5:30

वडिलांचे गुण मुलांमध्ये येतात असे नेहमी म्हटले जाते आणि हेच न्यू दिंडोशी म्हाडा कॉलनी येथे राहणाऱ्या एका १८ वर्षाच्या ...

The young man met Shadu's father at home | तरुणाने घरीच साकारला शाडूचा बाप्पा, कोरोनाकाळात यू-ट्यूबवरून घेतले प्रशिक्षण

तरुणाने घरीच साकारला शाडूचा बाप्पा, कोरोनाकाळात यू-ट्यूबवरून घेतले प्रशिक्षण

वडिलांचे गुण मुलांमध्ये येतात असे नेहमी म्हटले जाते आणि हेच न्यू दिंडोशी म्हाडा कॉलनी येथे राहणाऱ्या एका १८ वर्षाच्या मुलांनी सिद्ध करून दाखवले आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक सुनील थळे यांचा १८ वर्षाचा मुलगा श्रेयस थळे याने पर्यावरणाचा संदेश देत स्वतः घरातच शाडूची बाळ गणेश मूर्ती साकारली आहे. त्याच्या या कलेचे न्यू दिंडोशी म्हाडा परिसरात आणि सोशल मीडियावर आणि राजकीय नेत्यांकडून कौतुक होत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून तो स्वतः यू ट्यूबवर गणपती कसे बनवतात ते पाहून स्वतःच घरी गणपती बनवण्याचा प्रयत्न करत त्याने कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये एक आवड म्हणून प्रथम एक गणेश मूर्ती साकारली. ती पाहून त्यांच्या मित्र परिवारांनी प्रोत्साहन देऊन अजून ३ गणेश मूर्ती बनविल्या, अशी माहिती सुनील थळे यांनी लोकमतला दिली.

सुनील थळे हे चित्रपट क्षेत्रात गेली २० वर्ष काम करीत असून त्याने आजपर्यंत मराठी, हिंदी असे अनेक चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहे. आज त्यांचा मुलगा श्रेयस थळे याने हा सुद्धा कला क्षेत्रात आपलं भविष्य सफल करण्याकरिता लहानपणापासूनच अनेक कला स्पर्धेत भाग घेऊन त्याने अनेक प्रमाणपत्र आणि बक्षिसे जिंकली आहे. तो यंदा १२ वीची परीक्षा पास झाला असून आता मॉडेल आर्टला ॲडमिशन घेणार आहे.

या वर्षी त्याने प्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे यांच्याकडून प्रेरणा घेऊन सुंदर बाळ गणेश मूर्ती साकारली. विशेष म्हणजे बाळ गणेशाचे दर्शन घेण्यास स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर, दिंडोशीचे आमदार, माजी महापौर सुनील प्रभू, मुंबईचे उप महापौर अँड. सुहास वाडकर, आणि स्थनिक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते. तसेच चित्रपट सृष्टीतील अनेक कला दिग्दर्शकांनी थळे यांच्या घरी भेट देऊन श्रेयसचे कौतुक केले.

Web Title: The young man met Shadu's father at home