प्रेयसीवर हल्ला करुन तरुणाने स्वत:ला संपविले

By Admin | Updated: July 12, 2014 02:06 IST2014-07-12T02:06:40+5:302014-07-12T02:06:40+5:30

अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून एका तरुणाने विवाहित प्रेयसीवर कटरने अमानुषपणो हल्ला केल्याची घटना कांदिवलीत घडली. तरुणाने स्वत:वरही कटरने वार केले.

The young man attacked himself with the attack | प्रेयसीवर हल्ला करुन तरुणाने स्वत:ला संपविले

प्रेयसीवर हल्ला करुन तरुणाने स्वत:ला संपविले

>मुंबई : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून एका तरुणाने विवाहित प्रेयसीवर कटरने अमानुषपणो हल्ला केल्याची घटना कांदिवलीत घडली. तरुणाने स्वत:वरही कटरने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
कांदिवली (प.) येथील रामचंद्र पडळकर चाळीत 28 वर्षीय पीडित विवाहित महिला दोन मुलांसमवेत राहते. याच चाळीत जितेंद्र  पाटील (32) या अविवाहित तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते. कॅमेरामन म्हणून काम करणारा जितेंद्र शुक्रवारी सायंकाळी तिच्या घरी गेला. सोबत आणलेला फरशी कटर इलेक्ट्रिक प्लगला जोडून त्याने तिच्या डोक्यासह हातावर व पोटावर चालवला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिने आरडाओरड केल्यानंतर जितेंद्रने भीतीपोटी स्वत:वरच कटर चालवला. यात त्याचा मृत्यू झाला. पीडितेची प्रकृती गंभीर आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The young man attacked himself with the attack