मोबाईल चोराला पकडल्याच्या रागात तरुणावर ब्लेडने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:06 IST2021-09-03T04:06:41+5:302021-09-03T04:06:41+5:30

चेंबूरमधील घटना, चोर अटकेत चेंबूरमधील घटना, चोर अटकेत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चेंबूर परिसरात एकट्या तरुणाला हेरुन त्याच्याकडील ...

The young man is attacked with a blade in anger after catching a mobile thief | मोबाईल चोराला पकडल्याच्या रागात तरुणावर ब्लेडने हल्ला

मोबाईल चोराला पकडल्याच्या रागात तरुणावर ब्लेडने हल्ला

चेंबूरमधील घटना, चोर अटकेत

चेंबूरमधील घटना, चोर अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चेंबूर परिसरात एकट्या तरुणाला हेरुन त्याच्याकडील मोबाईल, पैसे हिसकावून चोराने पळ काढ़ला. तरुणाने त्याचा पाठलाग करत त्याला पकडले आणि मोबाईल परत मिळवला. याच रागात चोराने जवळील ब्लेडने तरुणाच्या मानेवर, हातावर वार केले. मदतीसाठी पुढे आलेल्या एकावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत चोराला अटक केली आहे.

टिळकनगर येथील इंदिरानगर परिसरात राहणारा अर्जुन प्रल्हाद कनोजिया (२०) यामध्ये जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास टिळकनगर कॉलनीतील वेगवेगळ्या इमारतीमधून इस्त्रीचे कपडे आणण्याकरिता तो सायकलने निघाला. पुढे लाल मैदान परिसरात एक व्यक्ती समोर धडकली. सायकलवरून खाली उतरल्यानंतर तो अंगझडती घेऊ लागला आणि मारण्याची धमकी देत मोबाईल आणि ५०० रुपये हिसकावून पळ काढला. तरुणानेही त्याचा पाठलाग करत त्याला पकडले आणि मोबाईल ताब्यात घेतला. याच रागात चोराने त्याच्यावर ब्लेडने वार करत पळ काढला.

पुढे पोलिसांनी महेश बाबर नावाच्या व्यक्तीला पकडून पोलीस ठाण्यात आणले. यावेळी हल्ला करणारा बाबरच असल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: The young man is attacked with a blade in anger after catching a mobile thief