मुंबई - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोनाचा संसर्ग, शेतकऱ्यांचे प्रश्न, मेट्रो कारशेडचा तिढा आणि कंगना व अर्णब गोस्वामींवरून झालेले वाद अशा विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी महाविकास आघाडीला वारंवार कायद्याच्या राज्याची आठवण करून दिली. तुम्ही हे राज्य २५ वर्षे चालवा किंवा २७ वर्षे चालवा. पण हे कायद्याने चालवा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला दिला.विधिळमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सुरुवात करताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, असा टोला त्यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीवरून लगावला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मदत करणे हा मुख्यमंत्रिपदाचा अपमान नव्हे का, असे ते म्हणाले.
"तुम्ही राज्य २५ वर्षे चालवा किंवा २७ वर्षे, पण..."; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
By बाळकृष्ण परब | Updated: December 15, 2020 15:34 IST
Devendra Fadnavis News :
तुम्ही राज्य २५ वर्षे चालवा किंवा २७ वर्षे, पण...; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
ठळक मुद्देतुम्ही हे राज्य २५ वर्षे चालवा किंवा २७ वर्षे चालवा. पण हे कायद्याने चालवाकोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आम्ही एक पुस्तिकाच प्रकाशित करणार हे कायद्याचं राज्य आहे. सरकारने कायद्यानुसार कारभार केला पाहिजे