शून्य गाठायचा आहे

By Admin | Updated: December 2, 2014 00:30 IST2014-12-02T00:30:26+5:302014-12-02T00:30:26+5:30

एड्स हा जीवघेणा आजार वैद्यकीय क्षेत्रासमोर आव्हान आहे. या आजाराचा बीमोड करण्यासाठी शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत.

You have to go to zero | शून्य गाठायचा आहे

शून्य गाठायचा आहे

सुरेश लोखंडे, ठाणे
एड्स हा जीवघेणा आजार वैद्यकीय क्षेत्रासमोर आव्हान आहे. या आजाराचा बीमोड करण्यासाठी शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत. या आजाराबाबतच्या जनजागृतीसाठी १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. यासाठी ‘शून्य गाठायचा आहे’ हे घोषवाक्य या वर्षी निश्चित करण्यात आले आहे. त्याद्वारे जनजागृती करून एड्स निर्मूलनासाठी युवकांमध्ये जनजागृती अभियान हाती घेण्यात येत आहे.
एचआयव्ही, एड्सबाबत युवावर्गात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे. यासाठी एड्सविरोधी अभियान हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यासह ती अधिक तीव्र करण्यासाठी युवकांना सक्षम करणे आवश्यक आहे. यामुळेच एड्सबाधित कलंक व भेदभाव कायमस्वरूपी मिटवणे शक्य होणार आहे. या अभियानास यशस्वी करण्यासाठीच जागतिक आरोग्य संघटनेने ‘शून्य गाठायचा आहे’ हे घोषवाक्य निश्चित केले आहे.
एचआयव्हीबाधित रुग्ण जगात पहिल्यांदा १९८१ मध्ये अमेरिकेत आढळून आला. भारतामध्ये तो १९८६ मध्ये चेन्नईत आढळून आला, तर महाराष्ट्रामध्येदेखील १९८६ मध्ये मुंबईत एचआयव्हीबाधित रुग्ण आढळून आला. यानंतर, नॅको म्हणजे नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनची १९९२ मध्ये स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रात १९९९ मध्ये एड्स नियंत्रण सोसायटी आणि ठाणे जिल्ह्यासह अन्यही जिल्ह्यांत २० फेब्रुवारी २००९ च्या कालावधीत एड्स नियंत्रण प्रतिबंध व नियंत्रण विभाग स्थापन झाला आहे.
जिल्ह्यातील एड्स प्रतिबंध व नियंत्रणासाठी जिल्हा रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालये तसेच महानगरपालिकांची रुग्णालये आदी ठिकाणी सुमारे ३६ आयसीटीसी केंद्रे कार्यान्वित करण्यात आले आहेत. येथे एचआयव्हीची मोफत तपासणी केली जात आहे. यास अनुसरून ठाणे जिल्ह्यासाठी नुकतीच चार नवीन आयसीटीसी केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. याद्वारे लवकरच मोफत एचआयव्ही तपासणी केली जाणार आहे.
याप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागात कार्यरत असलेल्या ७८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येक व्यक्तीसह गरोदर मातेची एचआयव्ही तपासणी केली जात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

Web Title: You have to go to zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.