आपली जीवनशैली बदलावी लागेल
By Admin | Updated: June 5, 2015 00:53 IST2015-06-05T00:53:40+5:302015-06-05T00:53:40+5:30
पायाभूत प्रकल्पांमुळे झालेले नुकसान, बिघडलेला असमतोल, लोकविरोधी संवर्धन धोरणे, औद्योगिक आणि पाण्याचे प्रदूषण, वेगवान शहरीकरण अशा कारणांमुळे निसर्ग धोक्यात आला आहे.

आपली जीवनशैली बदलावी लागेल
मुंबई : पायाभूत प्रकल्पांमुळे झालेले नुकसान, बिघडलेला असमतोल, लोकविरोधी संवर्धन धोरणे, औद्योगिक आणि पाण्याचे प्रदूषण, वेगवान शहरीकरण अशा कारणांमुळे निसर्ग धोक्यात आला आहे. मुळात आपण निसर्गाला अनुरुप वागत नाही. निसर्गाच्या विरोधात वागतो. निसर्गाचे नुकसान करतो. आपल्या अशा वागण्याने ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढला आहे. आणि आता हा धोका टाळायचा असेल तर आपण आपली जीवनशैली बदलत निसर्गाला अनुरुप म्हणजे साधे-सरळ आयुष्य जगले पाहिजे.
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने माझा नागरिकांना असा संदेश आहे की; आजवर आपण निसर्गाचे अतोनात नुकसान केले आहे. जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणाने उच्च पातळी गाठली आहे. हे आपण नाकारू शकत नाही. वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैलीतून अनेक समस्या निर्माण होत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. सागरपातळीची वाढ, बर्फाचे वितळणे, समुद्रातील पाण्याची वाफ; अशा अनेक घटनांमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. वाढत जाणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे यात दिवसेंदिवस भरच पडत आहे.
पर्यावरणात जो मानवी हस्तक्षेप झाला आहे; त्याकडे कानाडोळा केला जातो आहे. यावर उपाय म्हणजे आपण निसर्गाला हानी पोहचविता कामा नये. आपली जीवनशैली बदलली तर सारे ठिक होईल. आपण आपल्या सुखासाठी, स्वार्थासाठी, चैनीच्या आयुष्यासाठी पर्यावरणाचा गळा घोटतो आहोत. विकासाचा हव्यास सर्वांनाच विनाशाकडे घेऊन जातो आहे. विकासाची व्याख्या आपण केली; मात्र ती करताना पर्यावरणाला बगल दिली. अशाने झाले असे की, विकासाच्या हव्यासामुळे, मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील हिरवळ नष्ट होते आहे. हे सगळे थांबवायचे असेल तर हिरवळ वाढवावी लागेल. यासाठी प्रत्येकाने पुढे यावे.
च्संयुक्त राष्ट्र महासभेच्या जागतिक पर्यावरण संमेलनामध्ये १९७२ साली साली पर्यावरण दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. तेव्हापासून ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.
च्पर्यावरणात जो मानवी हस्तक्षेप झाला आहे; त्याकडे कानाडोळा केला जातो आहे. असे करून हाती काहीच लागणार नाही. उलटपक्षी अशाने सगळे काही नष्ट होईल. यावर साधा, सोपा आणि सरळ उपाय म्हणजे आपण आता निसर्गाला हानी पोहचविता कामा नये. आपण जीवनशैली बदलली तर सारे ठीक होईल.