योगगुरू बाबा रामदेवांनी घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट

By Admin | Updated: May 17, 2017 11:18 IST2017-05-17T10:29:12+5:302017-05-17T11:18:29+5:30

योगगुरू बाबा रामदेव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

Yogguru Baba Ramdev took a good wishes of Raj Thackeray | योगगुरू बाबा रामदेवांनी घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट

योगगुरू बाबा रामदेवांनी घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17 - योगगुरू बाबा रामदेव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. राज ठाकरे यांचे भेट घेण्यासाठी बाबा रामदेव राज यांचे निवासस्थान कृष्णकुंजवर येथे दाखल झाले होते.  
 
सदिच्छा भेट असे जरी म्हटले असले तर या भेटीबाबतीच नेमकी माहिती अद्याप स्पष्ट समोर आलेली नाही. 
 
 
दरम्यान, राजकारण आणि योग या विषयांवर चर्चा करण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याची माहिती राज ठाकरे यांच्या निकटवर्तियांनी दिली आहे.
 
बुधवारी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास  कृष्णकुंज येथे बाबा रामदेव दाखल झाले. यावेळी दोघांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली.
 
 
""बाबा रामदेव यांना भेटून आनंद झाला. हिंदू संस्कृतीतील योगाचे आणि आयुर्वेदाचे भारताने पाहिलेले हे सर्वात मोठे जागतिक प्रचारक आहेत"", अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी रामदेव बाबांच्या सदिच्छा भेटीबाबत दिली आहे. 
 
 
 

Web Title: Yogguru Baba Ramdev took a good wishes of Raj Thackeray