मुंबई : २०२४-२६ या कार्यकाळासाठी स्टील मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षपदी योगेश मानधनी (एस. एम. डब्ल्यू इस्पात प्रा. लि.) यांची तर सचिवपदी कमलकिशोर गुप्ता (स्टील रोलिंग मिल ऑफ महा.) यांची नेमणूक करण्यात आली. ही निवड मुंबई येथे जतिन पारेख यांच्या देखरेखीखाली पार पडली.
उपाध्यक्षपदी अनिल गोयल (कालिका स्टील अलॉयज प्रा. लि.) व विपिन अग्रवाल तर खजिनदारपदी हरीश चंद्राण (हरी स्टील इंडस्ट्रीज प्रा. लि.)यांची निवड झाली. सहसचिवपदी आशिष गुप्ता (अंबे फेरो मेटल प्रोक प्रा. लि.) दिनेश अग्रवाल (जालना सिद्धिविनायक अलॉयज प्रा. लि.), मोहम्मद शफीक खान (चॅम्पियन रोलिंग मिल प्रा. लि.), संजीव शर्मा (इंडस्ट्रील स्टील रोलिंग मिल ॲण्ड कंपनी), सुनील एफ. अग्रवाल (रेजेन्सी इस्पात प्रा. लि.), विवेक बिरीवाल (हेला इन्फ्रा मार्केट मेटल प्रा. लि.), नितीन गुप्ता (आर. एल. स्टील्स अँड एनर्जी लि.) यांची निवड करण्यात आली आहे. (वा. प्र.)