‘होय, आम्ही काळाबाजार करतो!’
By Admin | Updated: April 15, 2015 01:30 IST2015-04-15T01:30:18+5:302015-04-15T01:30:18+5:30
रेशनिंगमध्ये सुरू असलेल्या काळाबाजाराबाबत प्रशासन उघडपणे बोलत नसले, तरी रेशनिंग दुकानदार संघटनेने मात्र काळाबाजार करत असल्याचा खुलासा ‘लोकमत’जवळ केला आहे.

‘होय, आम्ही काळाबाजार करतो!’
चेतन ननावरे ल्ल मुंबई
रेशनिंगमध्ये सुरू असलेल्या काळाबाजाराबाबत प्रशासन उघडपणे बोलत नसले, तरी रेशनिंग दुकानदार संघटनेने मात्र काळाबाजार करत असल्याचा खुलासा ‘लोकमत’जवळ केला आहे. गेल्या वर्षभरापासून शिधा पुरवठ्यात सुरू असलेली कपात आणि तुटपुंज्या कमिशनमुळे दुकानदारांनी धान्याचा काळाबाजार सुरू केल्याची माहिती मुंबई रेशनिंग दुकानदार संघटनेतर्फे देण्यात आली आहे.
स्वस्त अन्नधान्य योजनेत गेल्या वर्षभरापासून गहू आणि तांदूळ विक्रीमध्ये दुकानदारांना किलोमागे एक रुपयाचा तोटा सहन करावा लागत आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे. काळा बाजार करण्यावाचून पर्याय नसल्याचे नविन मारू यांनी सांगितले. गेल्या ५० वर्षांमध्ये दुकानदारांच्या कमिशनमध्ये सरकारने वाढकेलेली नाही. भारतीय खाद्य निगमच्या गोदामापासून गहू किंवा तांदळाचे पोते आणण्याचा वाहतूक आणि हमाली खर्च दुकानदारांच्या माथी मारला जात आहे. त्याबदल्यात दुकानदारांना परताव्यापोटी २० रुपयेही मिळत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
असा होतोय भ्रष्टाचार...
गव्हाची मूळ खरेदी किंमत
१.८० रुपये/किलो
वाहतूक खर्च १.२० रुपये/किलो
एकूण खरेदी किंमत ३ रुपये
विक्री किंमत २ रुपये
तांदळाची मूळ खरेदी किंमत
२.८०रुपये/किलो
वाहतूक खर्च १.२० पैसे/किलो
एकूण खरेदी किंमत ४ रुपये
विक्री किंमत ३ रुपये
...तर दुकाने बंद करू
च्गहू आणि तांदूळ विक्रीत प्रती किलो एक रुपयांचा तोटा होत असल्याने दुकानदार धान्याचा काळाबाजार करत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. परिणामी दुकान बंद का करत नाही?, अशी विचारणा केली असता, शासनाने दुकानदारांचे पुनर्वसन केल्यास नक्कीच दुकाने बंद करू, अशी प्रतिक्रिया संघटनेने दिली.