यंदाचा राजहंस प्रतिष्ठानचा "राजहंस पुरस्कार " तबल्याला समर्पित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 21:08 IST2018-05-04T21:08:35+5:302018-05-04T21:08:35+5:30
गेली 25 वर्षे आपले कार्य रुग्णसेवेला समर्पित करणाऱ्या गोरेगांवातील राजहंस प्रतिष्ठान ही संस्था विविध क्षेत्रातील मान्यवरांचा "राजहंस पुरस्कार" देऊन समर्पित करते.

यंदाचा राजहंस प्रतिष्ठानचा "राजहंस पुरस्कार " तबल्याला समर्पित
मुंबई - गेली 25 वर्षे आपले कार्य रुग्णसेवेला समर्पित करणाऱ्या गोरेगांवातील राजहंस प्रतिष्ठान ही संस्था विविध क्षेत्रातील मान्यवरांचा "राजहंस पुरस्कार" देऊन समर्पित करते. यंदा या संस्थेचा दोन दिवसीय आनंद मेळावा उद्या दि, 5 व रविवार दि,6 मे रोजी सायांकाळी 5.30 वाजता गोरेगांव(पूर्व)नंदादीप विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
उद्या शनिवार दि,5 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता नंदादीप विद्यालयाच्या प्रांगणात राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद वायकर यांच्या हस्ते गोरेगांवातील विजयी नगरसेकांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.तर मोटारीतून मुंबई ते लंडन असा प्रवास करून आलेले बद्रीनारायण बल्दवा तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेती व नंदादीप शाळेची विद्यार्थिनी कोमल देवकर या दोघांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.या प्रसंगी मार्गदर्शक संगीतकार अरविंद मुखेडकर द्वारा निर्मित विशेष दिव्यांग मुलांच्या अद्भुत सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला असून सुसंवादीका स्मिता आपटे करणार आहेत.
रविवार दि,6 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता 2018 च्या राजहंस पुरकाराचे वितरण राज्याचे उच्च शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तायडे यांच्या हस्ते होणार असून यंदाचा राजहंस पुरस्कार तबल्याला समर्पित करण्यात आला आहे. संपूर्ण आयुष्य निरपेक्षपणे तबला विद्यादान करणाऱ्या 5 तबला गुरूंची यंदा राजहंस पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.पं. भाई गायतोंडे,पं.सुधीर माईणकर, पं. बापू पटवर्धन,पं.श्रीधर पाध्ये,पं. अरविंद मुळगांवकर(मरणोत्तर) यांना राजहंस पुरकार देऊन गौरविण्यात येणार असून नामवंत संगीतकार पं. नाना मुळे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.25000 रुपयांचा धनादेश,पुष्पगुच्छ, शेला,स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.यावेळी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांचा तबला सोलो आयोजित करण्यात आला असून सुसंवाद प्रा.केशव परांजपे करणार आहेत.