Join us
Daily Top 2Weekly Top 5

रमेश झवर ह्यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 21:47 IST

सुप्रसिद्ध पत्रकार रमेश झवर ह्यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा आचार्य अत्रे स्मारक समितीच्या अध्यक्षा आरती पुरंदरे- सदावर्ते ह्यांनी केली. 

मुंबई, दि. 1 - सुप्रसिद्ध पत्रकार रमेश झवर ह्यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा आचार्य अत्रे स्मारक समितीच्या अध्यक्षा आरती पुरंदरे- सदावर्ते ह्यांनी केली. रमेश झवर ह्यांची पत्रकारिता आचार्य अत्र्यांच्या मराठीत सुरू झाली. आचार्य अत्र्यांच्या हाताखाली पत्रकारितेचे धडे त्यांनी गिरवल्यानंतर  त्यांच्यावर    'सांज मराठा'ची जबाबदारी सोपवली आली होती. 'सांज मराठा'नंतर त्यांनी लोकसत्तेत उपसंपादक, प्रमुख उपसंपादक, वृत्तसंपादक, सहसंपादक आणि साह्यायक संपादक पदावर कार्य केले. ह्या काळात पंतप्रधानांसमवेत परदेश दौरेही केले. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांचे कार्यक्रम झाले. कर्जत येथे वैष्णव पंथीय केंद्रातर्फे चालणार्‍या  सेवाभावी कार्यातही ते सहभागी झाले. आजही इंटरनेटच्या माध्यमातून त्यांची पत्रकारिता सुरू असून रमेश झवर डॉट कॉमचे ते मुख्य संपादक आहेत.वरळी येथील आचार्य अत्र्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापाशी दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.००  वाजता समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात सकाळचे माजी संपादक राधाकृष्ण नार्वेकर ह्यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. कार्यक्रमास मुंबईचे महापौर उपस्थित राहणार आहेत.