मुंबई : युको बँकने यशोवर्धन बिर्ला यांना कर्जबुडवा घोषित केले आहे. त्यांची कंपनी बिर्ला सूर्या लिमिटेडवर युको बँकचे 67.55 कोटी रुपयांचे कर्ज आहे. व्याज आणि ही रक्कम वेळोवेळी नोटीसा पाठवूनही न भरल्याने 2013 मध्ये एनपीए घोषित करण्यात आले होते.
एसबीआय, पीएनबी आणि बँक ऑफ इंडियाच्या गटासोबत यूको बँकेने बिर्ला सूर्याला कर्ज दिले होते. या कंपनीचे यशोवर्धन बिर्ला संचालक आहेत. तसेच ते यश बिर्ला ग्रुपचेही अध्यक्ष आहेत.
बँकेने कंपनीचे संचालक, प्रवर्तक आणि जामिनदार यांना कर्ज बुडवे घोषित केले आहे. आरबीआयच्या निर्देशांनुसार कर्जबुडव्यांना कोणतेही कर्ज दिले जात नाही. कंपनीवर पाच वर्षे नवीन उद्योग आणण्यासही बंदी आणली जाते. तसेच कंपनीच्या संचालकांवर गुन्हाही दाखल करण्यात येऊ शकतो.
पणजोबांनी स्थापन केलेली यूको बँकमहत्वाचे म्हणजे यूको बँक यशोवर्धन यांचे पणजोबा घनश्याम दास बिर्ला यांनी 1943 मध्ये कोलकातामध्ये स्थापन केली होती. ही बँक 1969 मध्ये सरकारने अधिग्रहन केले होते. यूको बँकेने 665 कर्ज बुडव्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये झूम डेव्हलपर्स (309.50 कोटी), फर्स्ट लीजिंग कंपनी ऑफ इंडिया (142.94 कोटी), मोजर बेयर इंडिया (122.15 कोटी) आणि सूर्या विनायक इंडस्ट्रीज (107.81 कोटी) या कंपन्यांचा समावेश आहे.