Join us
Daily Top 2Weekly Top 5

यश राज फिल्मने सादर केले सुशांतसोबतचे कॉन्ट्रॅक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 04:57 IST

यश राज फिल्मने सुशांतसोबतची कॉन्ट्रॅक्ट कॉपी पोलिसांकडे सादर केली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांचे जबाब नोंदविले आहेत. तसेच शनिवारी सुशांतच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅडव्होकेट प्रियंका खिमानी यांच्याकडे पाच तास विचारपूस करत जबाब नोंदवला आहे. तसेच यश राज फिल्मने सुशांतसोबतची कॉन्ट्रॅक्ट कॉपी पोलिसांकडे सादर केली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.सुशांत आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत पोलीस बॉलीवूडमधील व्यावसायिक स्पर्धेच्या दिशेने तपास करत आहेत. मात्र सुशांत हा काही व्यावसायिक तसेच वैयक्तिक मुद्द्यांमुळे अस्वस्थ होता. याशिवाय ते कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकलेले नाहीत. दरम्यान, यश राज फिल्मकडून सुशांतने स्वाक्षरी केलेल्या चित्रपटांची कॉन्ट्रॅक्ट कॉपी तपास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यानुसारही अधिक तपास सुरू आहे. गरज पडल्यास त्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असेही पोलिसांनी नमूद केले. सुशांतच्या आयुष्यातील नेमक्या समस्या शोधण्यासाठी अधिकाधिक लोकांचे जबाब नोंदवत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.यापूर्वी बुधवारी पोलिसांनी दिग्दर्शक मुकेश छाबरा यांचा जबाब नोंदवून घेतला होता. सुशांतच्या वैयक्तिक आयुष्याबाबत त्यांना काही माहिती आहे का, याबाबतही त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात आली. ते ५ तास पोलीस ठाण्यात होते. छाबरा यांनी सुशांतच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जास्त माहिती नसल्याचे नमूद केले. अन्य एका पोलीस अधिकाºयाने सांगितले की, छाबरा यांनी दिग्दर्शन केलेल्या एका चित्रपटात सुशांतने काम केले आहे. तो चित्रपट लॉकडाऊनमुळे प्रदर्शित झाला नाही. तो आॅनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सुशांतने अभिनय केलेला हा शेवटचा चित्रपट होता. आतापर्यंत पोलिसांनी राजपूतचे वडील, डॉक्टर, कर्मचारी आणि मित्र आणि छाबरा यांच्यासह १५ जणांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच रविवारीही मित्रमंडळीकडे चौकशी सुरू होती.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत