यश बिर्लांच्या संपत्तीवर टाच?

By Admin | Updated: January 13, 2017 04:38 IST2017-01-13T04:38:51+5:302017-01-13T04:38:51+5:30

तीनशे कोटी रुपये फसवणूक प्रकरणी इंडस्ट्रीयलिस्ट यश बिर्ला यांची मालमत्ता जप्त करण्याबाबत

Yash Birla's wealth? | यश बिर्लांच्या संपत्तीवर टाच?

यश बिर्लांच्या संपत्तीवर टाच?

मुंबई : तीनशे कोटी रुपये फसवणूक प्रकरणी इंडस्ट्रीयलिस्ट यश बिर्ला यांची मालमत्ता जप्त करण्याबाबत राज्य सरकारने काढलेली अधिसूचना रात्रपत्रात प्रसिद्ध केली असल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष एमपीआयडी न्यायालयाला दिली. यश बिर्ला यांचे मलबार हिल येथील बिर्ला हाउस, जुहू व माहीम येथील भूखंड आणि कंपनीशी संबंधित बँक खाती जप्त करण्याचा निर्णय ईडीने घेतला आहे आणि त्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बिर्ला यांची संपत्ती जप्त करण्याचा ईडीचा अर्ज आणि बिर्ला यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर विशेष न्यायालयाने मार्चमध्ये सुनावणी ठेवली आहे. दरम्यान विशेष न्यायालयाने बिर्ला यांना दिलेला दिलासा कायम केला. (प्रतिनिधी)

Web Title: Yash Birla's wealth?