जातपडताळणीचा निर्णय चुकीचा - चव्हाण

By Admin | Updated: April 19, 2015 23:31 IST2015-04-19T23:31:55+5:302015-04-19T23:31:55+5:30

निवडणूक लढविताना जातपडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक करून आरक्षित जागेवर योग्य त्या उमेदवाराला निवडणूक लढविण्याची संधी मिळत होती.

Wrong decision decision of Chavan - Chavan | जातपडताळणीचा निर्णय चुकीचा - चव्हाण

जातपडताळणीचा निर्णय चुकीचा - चव्हाण

अंबरनाथ : निवडणूक लढविताना जातपडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक करून आरक्षित जागेवर योग्य त्या उमेदवाराला निवडणूक लढविण्याची संधी मिळत होती. मात्र, शिवसेना-भाजपा सरकारने हा निर्णय बदलून जातपडताळणी प्रमाणपत्र निवडणुकीनंतर सादर करण्याचे आदेश काढले. या निर्णयामुळे आरक्षित उमेदवारावर अन्याय होणार असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषद निवडणुकांत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवित आहे. या दोन्ही पालिकांच्या निवडणूक प्रचारासाठी चव्हाण यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. अंबरनाथमध्ये सभेचे आयोजन केले होते. या सभेत काँग्रेसचे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक उमेश पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. २० वर्षे सत्तेवर असतानाही शिवसेनेने प्रश्न सोडविले नाहीत. खोटी माहिती देऊन मतदारांची दिशाभूल करण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Wrong decision decision of Chavan - Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.