मुंबई- 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या नूतन अध्यक्षांची घोषणा झाली आहे. ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले आहेत. 98व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार ह्यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत. नाट्य संमेलनाचे ठिकाण लवकरच जाहीर होणार असून, नागपूर, लातूर , पिंपरी चिंचवड या ठिकाणांची नावं स्पर्धेत आहेत. नाट्य संमेलन समिती ह्या ठिकाणांचा दौरा करून संमेलनाचे अंतिम ठिकाण लवकरच ठरवणार आहे. श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर अशी नावे स्पर्धेत होती, मात्र प्रेमानंद गज्वी यांच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 14:46 IST