विचित्र अपघात सहा गंभीर जखमी

By Admin | Updated: September 16, 2014 23:23 IST2014-09-16T23:23:01+5:302014-09-16T23:23:01+5:30

नाशिक -मुंबई मार्गावरील कसारा घाटात मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता तीन गाडय़ांचा विचित्र अपघात होऊन 6 जण जखमी झाले.

Wounded accidentally injured six seriously | विचित्र अपघात सहा गंभीर जखमी

विचित्र अपघात सहा गंभीर जखमी

कसारा : नाशिक -मुंबई मार्गावरील कसारा घाटात मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता तीन गाडय़ांचा  विचित्र अपघात होऊन 6 जण जखमी झाले. नाशिकहून मुंबईकडे  येणारी ट्रेलर भरधाव वेगाने घाट उतरत असताना चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने तो पुढील कंटनेरला धडक देऊन राजूर वरुन कसा:याकडे येणा:या मॅक्स पिकअपवर पाठीमागून आदळला़ 
या विचित्र अपघातामुळे 6 जण गंभीर तर 4 जण किरकोळ जखमी झाले. त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींची नावे समजू शकली नाही. 
दरम्यान नवीन कसारा घाटात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे हा अपघात झाला असून काम करीत असताना ठेकेदाराने कुठल्याही प्रकारचे डायव्हर्शन बोर्ड लावले नसल्याने व पोलीस कर्मचारी न नेमल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. या विचित्र अपघाताचा कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय घोसाळकर करीत आहेत.

 

Web Title: Wounded accidentally injured six seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.