3 वर्षातील सर्वात वाईट आठवडा..!
By Admin | Updated: December 13, 2014 00:02 IST2014-12-13T00:02:27+5:302014-12-13T00:02:27+5:30
तेल कंपन्यांच्या समभागांत मोठी घसरण झाल्याने शुक्रवारी शेअर बाजार कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 251.33 अंकांनी कोसळून 27,350.68 अंकांवर बंद झाला.

3 वर्षातील सर्वात वाईट आठवडा..!
घसरण : मुंबई शेअर बाजार 251.33 अंकांनी खाली
मुंबई : तेल कंपन्यांच्या समभागांत मोठी घसरण झाल्याने शुक्रवारी शेअर बाजार कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 251.33 अंकांनी कोसळून 27,350.68 अंकांवर बंद झाला. दरम्यान, सेन्सेक्सची या आठवडय़ातील घसरण विक्रमी ठरली आहे. हा आठवडा तीन वर्षातील सर्वात वाईट आठवडा ठरला आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पाचपेक्षा अधिक वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेल्या आहेत. जुलै 2009 नंतर कच्च्या तेलाच्या किमती प्रथमच प्रतिबॅरल 60 डॉलरच्या खाली आल्या. कच्च्या तेलातील घसरण तेल कंपन्यांचा नफा कमी करणार आहे. त्यामुळे तेल कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारी उतरले. रिअल्टी, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, भांडवली वस्तू, धातू आणि ऊर्जा या क्षेत्रतील कंपन्यांनाही फटका बसला. आरआयएल, ओएनजीसी आणि गेल या कंपन्यांना मोठी घसरण सोसावी लागली. जागतिक अर्थव्यवस्था कमजोर होत असल्याचे संकेत तेलाच्या घसरणीतून मिळत आहेत.
मुंबई शेअर बाजारात मुख्यत: विक्रीचाच जोर दिसून आला. बीएसईमधील 12 क्षेत्रंर्पकी 11 क्षेत्रंचे निर्देशांक खाली आले. केवळ आरोग्य क्षेत्रचा एकमेव निर्देशांक तेजीसह बंद झाला.
हाँगकाँगचा अपवाद वगळता आशियातील इतर सर्व बाजार 0.16 टक्के ते 0.66 टक्के तेजीत राहिले. चीनच्या फॅक्टरी उत्पादनात घट आल्याच्या वृत्ताने युरोपीय बाजार मात्र खाली आले. सीएसी 1.67 अकांनी, डीएएक्स 1.66 अंकांनी, तर एफटीएसई 1.41 अंकांनी घसरले. अमेरिकेतील बाजार काल वर चढले.
1 हा आठवडा सेन्सेक्ससाठी वाईट ठरला. तब्बल 1,107.42 अंकांची अथवा 3.89 टक्क्यांची घसरण सेन्सेक्सने आठवडाभरात नोंदविली. डिसेंबर 2011 नंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण ठरली.
2 50 कंपन्यांच्या व्यापक आधारावरील नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 68.80 अंकांनी म्हणजेच 20.11 टक्क्यांनी कोसळून 8,224.10 अंकांवर बंद झाला.
3 ािसमसच्या आधी विदेशी संस्थांनी मोठय़ा प्रमाणात समभाग विक्री केली. त्याचाही परिणाम सेन्सेक्सवर झाला. काल विदेशी संस्थांनी 808.27 कोटी रुपयांचे समभाग विकले.
4 बाजाराचा एकूण व्याप नकारात्मक राहिला. 1,991 कंपन्यांचे समभाग घसरले. 919 कंपन्यांचे समभाग वाढले. 106 कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले.
सेन्सेक्सची सकाळची सुरूवात स्थिरतेने झाली. नंतर तो थोडा सुधारून 27,692.32 अंकांवर पोहोचला. युरोपीय बाजार सुरू झाल्यानंतर मात्र, सेन्सेक्स उतरणीला लागला. युरोपीय बाजारातील कमजोर कल सेन्सेक्सला धक्का देऊन गेला. सत्र अखेरीस 251.33 अंक अथवा 0.91 टक्के घसरण नोंदवून सेन्सेक्स 27,350.68 अंकांवर बंद झाला.