मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित असलेला वरळी फेस्टिव्हल मेळावा पाचव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. २६, २७ जानेवारी रोजी हा फेस्टिव्हल होणार आहे. यंदा संगीत, खाद्य, खरेदी असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. या वर्षीची थीम ‘आयुष्य एन्जॉय करू या’ अशी आहे.वरळी समुद्रकिनारी आयोजित केलेल्या या महोत्सवात स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि कोळी पाककृतींचे स्टॉल्स, हस्तकला, फॅशन व इतर अन्य प्रकारचे बाजारही भरविण्यात येणार आहेत. हिंदुस्तानी क्लासिकल संगीतही सादर करण्यात येणार आहे. यासह तरुण आणि लहान मुलांसाठी फन झोन, ट्विन ट्रिंग सायकल्स चालविण्यात येणार आहे. मागील वर्षी वरळी फेस्टिव्हल महोत्सवात १ लाखापेक्षा अधिक लोकांनी हजेरी लावली होती. ओक्स मॅनेजमेन्ट कन्सल्टन्सीच्या वतीने ‘वरळी फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असून, श्री संकल्प प्रतिष्ठान यांचे समर्थन आहे.बँड आॅफ बॉयस, चारू सेमवाल, यूफोनी, शिबानी कश्यप यांसारखे कलाकार गीत सादर करणार आहेत. सूर्याेदयावेळी ‘मॉर्निंग रागाज् शो’ होणार आहे. यासह इको फेंड्रलीचे महत्त्व हा फेस्टिव्हल देणार आहे.
वरळी फेस्टिव्हल २६, २७ जानेवारीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 03:21 IST