Join us
Daily Top 2Weekly Top 5

माटुंग्यात जागतिक योगदिन साजरा, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे सहभागी

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 21, 2023 12:29 IST

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने, शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने माटुंगा येथे आयोजित ...

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने, शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने माटुंगा येथे आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिराला स्थानिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आज सकाळी ७ वाजता माटुंग्याच्या फाईव्ह गार्डन येथे सुमारे ३०० स्थानिक नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन योगा दिन साजरा केला.

यावेळी बोलताना खासदार शेवाळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेमुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात  विविध ठिकाणी आज जागतिक योगा साजरा केला जातो. त्यामुळे त्यांचे आभार मानायला हवेत. तसेच पंतप्रधानाच्या आवाहनामुळे जगातील १९८ देशांमध्ये मिलेट (तृणधान्य) वर्ष साजरे केले जात असताना आपणही आपल्या आहारात तृणधान्ये आवर्जून ठेवायला हवीत, असेही शेवाळे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला शिवसेना विभागप्रमुख अविनाश राणे, व्यंकटेश नायक, शेखर परदेशी यांसह अन्य मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :योगासने प्रकार व फायदेराहुल शेवाळे