जगाला आईची गरज
By Admin | Updated: March 9, 2015 01:22 IST2015-03-09T01:22:05+5:302015-03-09T01:22:05+5:30
संकटात असलेल्या प्रत्येक महिलेच्या मागे सर्व महिलांनी एकत्रित उभे राहिले पाहिजे. आज जगाला आईची गरज आहे. मातृत्वाचा गुण मागे ठेवून जग सुंदर होऊ शकत नाही’,

जगाला आईची गरज
मुंबई : ‘संकटात असलेल्या प्रत्येक महिलेच्या मागे सर्व महिलांनी एकत्रित उभे राहिले पाहिजे. आज जगाला आईची गरज आहे. मातृत्वाचा गुण मागे ठेवून जग सुंदर होऊ शकत नाही’, असे उद्गार माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी काढले.
जागतिक महिला दिनानिमित्त ‘बीइंग वुमन’ हा महिलांच्या कर्तृत्वावर आधारीत महिलांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम वांद्रे येथील रंगशारदा नाट्यमंदिर येथे पार पडला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी नीला सत्यनारायण यांनी पुरस्कार स्वीकारताना उद्गार काढले.
यावेळी रश्मी ठाकरे, अभिनेत्री पुनम ढिल्लों, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, माजी मंत्री वर्षा गायकवाड, उद्योजिका वर्षा सत्पाळकर, अभिनेत्री जिओकोंडा वेसिचेल्ली आदी मान्यवर उपस्थित होत्या. गेली अनेक वर्ष शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंदीप आणि बीआरडी फिल्म्सच्या संयुक्त विद्यमाने राजेश ढाबरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
डॉ. भावना राज यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या या कार्यक्रमाचे संयोजन राजेश ढाबरे यांनी केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकार राही भिडे, माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे, अभिनेत्री लिला गांधी, आयपीएस अधिकारी शारदा राऊत, नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे व संपादिका वैदेही सचिन यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘मुंबई अन्य शहरांच्या तुलनेत सुरक्षित असून याचे श्रेय जितके पोलिसांचे
आहे तितकेच महिला व पुरुषांचे असल्याचे शारदा राऊत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)