Join us  

भविष्यातील पत्रकारितेवर कार्यशाळा; जाणून घ्या, काय आहे 'डिजिटल मीडिया'!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 6:31 PM

डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रिंट आणि इलेक्ट्रॅानिक मीडियासमोर मोठं आव्हान उभं केलें आहे.

मुंबई: डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रिंट आणि इलेक्ट्रॅानिक मीडियासमोर मोठं आव्हान उभं केलें आहे. डिजिटल मीडिया या नव्या माध्यामाचे शिक्षण देणाऱ्या संस्थेचे प्रमाण देखील देशभरात कमी आहे. तसेच शिक्षणसंस्थांमधून शिक्षण देण्यात येत असले तरी यामध्ये प्रॅक्टिकलचा भाग कमी असतो. त्यामुळे डिजिटल मीडिया म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्याची संधी आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

प्रिंट आणि इलेक्ट्रॅानिक माध्यमांमध्ये जेवढी रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही त्याहून जास्त डिजिटल मीडिया या नवीन माध्यमांमध्ये होत आहे. मात्र या नवीन माध्यमाची ओळख नसणारे विद्यार्था मागे पडत आहेत. त्यामुळे आता डिजिटल मीडिया नक्की काय आहे याची तोंडओळख करुन देण्यासाठी साठ्ये महाविद्यालयात भविष्यातील पत्रकारितेवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तसेच या कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांना या माध्यमांमध्ये काम करणाऱ्या अनुभवी पत्रकारांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचप्रमाणे या कार्यशाळेत जे विद्यार्थी चांगली कामगिरी करतील त्यांना नामांकित वेबपोर्टलमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले आहे.

डिजिटल मीडियामध्ये नोकऱ्यांची संख्या वाढत असून यामध्ये अनुभव असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य मिळत असल्याने या कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांना अनुभव मिळवण्याची संधी मिळणार आहे. तसेच ही कार्यशाळा 23 सप्टेंबरपासून 9 अ‍ॅाक्टोबर पर्यत असून सोमवार ते शनिवार ( सुट्टीचे दिवस वगळता) सकाळी 10.30 ते 1.30 वाजेपर्यत असणार आहे. 

डिजिटल मीडियासाठी बातमीचे लिखाण कसे केले जाते, एसईओ म्हणजे नक्की काय, डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे राबवली जाते या महत्वाच्या विषयांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच वरील नमुद केलेल्या विषयांवर खासगी संस्थेमध्ये लाखो रुपयांची फी आकरण्यात येते, मात्र विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं या प्रांजळ हेतूमुळे या कार्यशाळेसाठी नाममात्र शुल्क ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे साठ्ये महाविद्यालयाच्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशिवाय पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या मुंबईतील सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा खुली असणार आहे. साठ्ये महाविद्यालयामध्ये न शिकणाऱ्या मात्र पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेचे शुल्क 1200 रुपये असणार आहे. तसेच या कार्यशाळेसाठीच्या जागा मर्यादित असल्यामुळे विद्यार्थ्यांनी 18 सप्टेंबरपर्यत नावे नोंदवून जागा  निश्चित करुन घ्यावीत. 

अधिक माहितीसाठी संपर्क-

साठ्ये महाविद्यालय- पत्रकारिता विभाग, रसिका सावंत मॅडम, मो. 9702914968ईमेल आयडी- rasika.sawant@sathayecollege.edu.in

टॅग्स :माध्यमेडिजिटलविद्यार्थीमहाविद्यालय