शेतकऱ्यांसाठी आज कामगार रस्त्यावर
By Admin | Updated: June 3, 2017 03:59 IST2017-06-03T03:59:38+5:302017-06-03T03:59:38+5:30
शेतकऱ्यांच्या संपाला राज्यातील औद्योगिक कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ३५ संघटनांच्या संयुक्त कृती समितीसोबत गिरणी

शेतकऱ्यांसाठी आज कामगार रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकऱ्यांच्या संपाला राज्यातील औद्योगिक कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ३५ संघटनांच्या संयुक्त कृती समितीसोबत गिरणी कामगारांच्या कृती संघटनेने शुक्रवारी पाठिंबा घोषित केला आहे. सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी शनिवार, ३ जून रोजी औद्योगिक कामगारांची संयुक्त कृती समिती दादरमध्ये, तर गिरणी कामगार कृती संघटना करी रोड नाक्यावर निदर्शने करणार आहे.
सायंकाळी ४.३० वाजता दादर येथील वीर कोतवाल उद्यानासमोर कामगार निदर्शने करतील़ गिरणी कामगार कृती संघटनेने करी रोड नाक्यावर सायंकाळी ४ ते ५ वाजेदरम्यान धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात मुंबईचे डबेवालेही सामील होणार आहेत. कृती संघटनेमधील रयतराज कामगार संघटना, गिरणी कामगार संघर्ष समिती व डबेवाल्यांची संघटना या आंदोलनात सहभागी होतील.