कामगारांना मिळाला थकीत पगार

By Admin | Updated: January 25, 2015 23:57 IST2015-01-25T23:57:53+5:302015-01-25T23:57:53+5:30

रसायनी येथील एचओसीचे कामगार पाच महिने पगारापासून वंचित असल्याच्या वृत्ताची दखल घेत कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना पंधरा दिवसांचा पगार दिला.

Workers got tired pay | कामगारांना मिळाला थकीत पगार

कामगारांना मिळाला थकीत पगार

मोहोपाडा : रसायनी येथील एचओसीचे कामगार पाच महिने पगारापासून वंचित असल्याच्या वृत्ताची दखल घेत कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना पंधरा दिवसांचा पगार दिला.
लोकमतने कामगारांच्या असंतोषाला वाचा फोडल्याने सुस्त व्यवस्थापनाला जाग आली व कामगारांचा उद्रेक होवू नये म्हणून अर्धा पगार तोही आॅगस्टचा देण्यात आला आहे. एचओसी व्यवस्थापनाने पंधरा दिवसांचा नव्हे, तर पूर्ण पाच महिन्यांचा पगार द्यावा अशी कामगारांची मागणी आहे. एचओसी आर्थिक डबघाईला आली असल्याने कामगारांच्या सर्व सोयीसुविधा बंद करण्यात आल्या असल्या तरी व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिका-यांच्या चुकीच्या निर्णयामुळे कंपनीची बिकट अवस्था झाली. (वार्ताहर)

Web Title: Workers got tired pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.