Join us

आज आयुक्त कार्यालयावर कामगारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 06:12 IST

मुंबई : कामगार कायद्यातील प्रस्तावित बदलांविरोधात बुधवारी बोलावलेल्या बैठकीस स्वत: कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीच दांडी मारल्याचा राष्ट्रीय मिल मजदूर संघाने निषेध केला.

मुंबई : कामगार कायद्यातील प्रस्तावित बदलांविरोधात बुधवारी बोलावलेल्या बैठकीस स्वत: कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीच दांडी मारल्याचा राष्ट्रीय मिल मजदूर संघाने निषेध केला. शिवाय महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने मिल मजदूर संघाने शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चाची हाकदिली आहे.कारखाना बंद करण्यासाठी लागणारी पूर्वीची १०० कामगारांची अट रद्द करून ती ३०० कामगारांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सरकारने तयार केला आहे. त्याला राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा तीव्र विरोध आहे.

टॅग्स :मुंबईआंदोलन