Join us  

बेस्ट संप सुरूच ठेवण्याचा कामगारांचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 9:33 PM

केलेल्या मागण्यांबाबत अद्याप योग्य तोडगा न निघाल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्धार बेस्ट कामगारांनी केला आहे.

मुंबई - केलेल्या मागण्यांबाबत अद्याप योग्य तोडगा न निघाल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्धार बेस्ट कामगारांनी केला आहे. वडाळा येथे झालेल्या बेस्ट कामगारांच्या मेळाव्यात बेस्ट कामगारांनी संप मागे घेण्यास नकार दिला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सलग आठव्या दिवशीही सुरू आहे. हा संप सोडवण्यासाठी गेल्या आठ दिवसांत करण्यात आलेले अनेक प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. बेस्ट कामगारांच्या सुरू असलेल्या संपाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती.  त्यावेळी  बेस्ट जनतेच्या पैशावर चालते, मग जनता वेठीस का धरताय, असा सवाल मुंबई हायकोर्टाने केला आहे. तसेच हा संप मिटवण्यासाठी तातडीने निर्णय घ्या, असे आदेश कोर्टाने बेस्ट प्रशासन आणि कर्मचाऱ्यांना दिले होते. मात्र त्यानंतरही बेस्ट कामगारांनी आपली ताठर भूमिका कायम ठेवली आहे. तसेच बेस्ट प्रशासनाने हायकोर्टात दिलेल्या प्रस्तावावरही कामगार संयुक्त कृती समितीने टीका केली आहे. 

टॅग्स :बेस्टमुंबई