रसायनीचे कामगार पगारापासून वंचित
By Admin | Updated: January 18, 2015 23:07 IST2015-01-18T23:07:08+5:302015-01-18T23:07:08+5:30
रसायनी औद्योगिक क्षेत्रातील हिंदुस्थान आॅरगॅनिक केमिकल्स लिमिटेड (एचओसी) या एकेकाळी सोन्याचा धूर निघणा-या कंपनीची अवस्था सध्या बिकट झाली

रसायनीचे कामगार पगारापासून वंचित
मोहोपाडा : रसायनी औद्योगिक क्षेत्रातील हिंदुस्थान आॅरगॅनिक केमिकल्स लिमिटेड (एचओसी) या एकेकाळी सोन्याचा धूर निघणा-या कंपनीची अवस्था सध्या बिकट झाली आहे. या अगोदर सुरू असणारे बारा उत्पादन प्रकल्प बंद असून त्यांना भंगारात विकण्याचे काम पूर्ण होत आले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कामगारांना एचओसी प्रशासनाने पगार दिलेला नाही. वाढती महागाई, कुटुंबाचा वाढता खर्च, आजारपण या संकटांनी कामगार मेटाकुटीला आला.
दरम्यान, अनेक कामगार व अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी उत्सुक असून पैसेच नसल्याने स्वेच्छानिवृत्ती देण्यात येत नाही, शिवाय कामगारांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतूनही कर्ज देण्यात येत नाही. कामगारांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार मिळणे बंद झाले आहे. या कंपनीत सध्या सहाशे कामगार असून चार कामगार संघटना आहेत, परंतु त्यांचेही अस्तित्व संपुष्टात आल्याने संघटना निष्क्रिय आणि उदासीन झाल्याचे चित्र आहे.