छाटणीदरम्यान मोठी फांदी अंगावर पडून कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:17 IST2020-11-22T09:17:42+5:302020-11-22T09:17:42+5:30
पवईतील दुर्घटना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पवईत फांद्यांच्या छाटणीदरम्यान मोठी फांदी अंगावर पडून २५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची ...

छाटणीदरम्यान मोठी फांदी अंगावर पडून कामगाराचा मृत्यू
पवईतील दुर्घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पवईत फांद्यांच्या छाटणीदरम्यान मोठी फांदी अंगावर पडून २५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
चेंबूरचा रहिवासी असलेला जसीन जकीर हाशमी असे मृत कामगाराचे नाव आहे. डॉ. आंबेडकर उद्यान परिसरातील झाडांवरील फांद्या छाटणीचे काम कंत्राटदाराने त्याला काम दिले होते. बुधवारी छोट्या झांडांवरील फांद्यांची छाटणी करताना अंगावर मोठी फांदी कोसळल्याने तो जखमी झाला. अन्य कामगारांनी त्याला तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे निदान डाॅक्टरांनी केले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आली असून जसीनच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.