लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई-अहमदाबादबुलेट ट्रेन मार्गातील महत्त्वाच्या बोगद्याच्या निर्मितीसाठी विक्रोळी येथे टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) शाफ्टमध्ये खाली उतरवून त्याची उभारणी सुरू करण्यात आली आहे. यामुळे वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते सावली (घणसोली) दरम्यान १६ किमी लांबीच्या बोगद्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मुंबई - अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत बीकेसी ते शिळफाटा दरम्यान २१ किमी लांबीचा भुयारी मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. यापैकी ५ किमी बोगदा न्यू आस्ट्रियन टनेल पद्धतीने पूर्ण करण्यात आला असून, उर्वरित १६ किमीचे काम टीबीएमच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. तो १३.१ मीटर व्यासाचा सिंगल-ट्यूब असेल, ज्यामध्ये दोन रेल्वे ट्रॅक असतील. तो जमिनीपासून २५ ते ५७ मीटर खोल असेल, तर पारसिक डोंगररांगेखालील सर्वांत खोल भाग सुमारे ११४ मीटरपर्यंत जाईल.
महापे येथे सेगमेंट कास्टिंग यार्ड
महापे येथे ११.१७ हेक्टर क्षेत्रावर टनेल लाईनिंगसाठी विशेष कास्टिंग यार्ड सुरू केले आहे. येथे ७७,००० सेगमेंट तयार करून ७,७०० रिंग तयार केल्या जाणार आहेत. प्रत्येक रिंगमध्ये नऊ वक्र सेगमेंट आणि एक की सेगमेंट असतील.
ऑक्टोबर २०२६ पासून मुख्य भुयारी कामाला वेग
भुयारी कामासाठी २ टीबीएम वापरण्यात येणार असून, दोन्ही टीबीएमचे परीक्षण व कमिशनिंग पूर्ण झाल्यानंतर जुलै २०२६ पासून प्रारंभिक ‘ड्राइव्ह’ सुरू होणार आहे, तर ऑक्टोबर २०२६ पासून मुख्य भुयारी कामाला वेग दिला जाणार आहे. भुयारीकरणाच्या कामासाठी टीबीएम जमिनीत उतरविण्यासाठी तीन ठिकाणी शाफ्ट उभारण्यात आले आहेत. त्यापैकी बीकेसी येथे रिट्रिव्हल शाफ्ट, विक्रोळी येथे मध्यवर्ती शाफ्ट तर सावली (घणसोलीजवळ) येथे तिसरा शाफ्ट असणार आहे.
Web Summary : The Mumbai-Ahmedabad bullet train's 16 km tunnel construction will soon commence. A tunnel boring machine is being assembled at Vikhroli. This underground section runs between BKC and Savli (Ghansoli). The project includes a 21 km underground stretch, with 5 km already completed via the New Austrian Tunnel method.
Web Summary : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन की 16 किमी सुरंग का निर्माण जल्द शुरू होगा। विक्रोली में एक टनल बोरिंग मशीन को इकट्ठा किया जा रहा है। यह भूमिगत खंड बीकेसी और सावली (घणसोली) के बीच चलता है। परियोजना में 21 किमी का भूमिगत खंड शामिल है, जिसमें से 5 किमी न्यू ऑस्ट्रियन टनल विधि से पूरा हो चुका है।