Join us

काम महिनाभर अन् पगार मात्र वर्षाचा, ३०० डॉक्टरांच्या बोगस नोंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 11:09 IST

ईडीने कोरोनाकाळात सेवा बजावलेल्या २०० ते ३०० डॉक्टरांना ई-मेल पाठवत माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : कोविड केंद्र घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून, कोरोनाकाळात सेवा बजावलेल्या २०० ते ३०० डॉक्टरांच्या बोगस नोंदी ईडीच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. महिनाभर काम केले असताना डॉक्टरांच्या नावे वर्षभर काम केल्याची बिले मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये ईडीला  २० कोटी रुपयांचे बिलिंग दर्शविणारे व्यवहार आढळून आले आहे. याबाबत डॉक्टरांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

ईडीने कोरोनाकाळात सेवा बजावलेल्या २०० ते ३०० डॉक्टरांना ई-मेल पाठवत माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी काहींनी त्यांचा बायोडेटा पालिकेला दिला. तर, काहींनी नागरी संस्थेसाठी काम केले. त्यापैकी काहींनी पालिकेसाठी १५ ते ३० दिवस काम केले. मात्र, त्यांच्या नावावर संपूर्ण वर्षाचे बिल मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना केंद्रामध्ये सेवा देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुमारे २०० हून अधिक डाॅक्टरांनी दिलेल्या सेवेपेक्षा अधिक कालावधी दाखवून त्यांच्या नावावर पैसे लुटण्यात आल्याचे उघड झाले आहे. 

टॅग्स :डॉक्टर