शिरसाड उड्डाणपूलाचे काम रखडले
By Admin | Updated: May 6, 2015 01:23 IST2015-05-06T01:23:36+5:302015-05-06T01:23:36+5:30
अहमदाबाद - मुंबई महामार्गावरील वाढते अपघात तसेच येथे झालेल्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरसाड येथील उड्डाणपूलाचे काम आयआरबी कंपनीने तत्काळ सुरू केले.

शिरसाड उड्डाणपूलाचे काम रखडले
मुंबई-अहमदाबाद महामार्ग : भुयारी मार्गासाठी नागरिकांचा संघर्ष
पारोळ : अहमदाबाद - मुंबई महामार्गावरील वाढते अपघात तसेच येथे झालेल्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरसाड येथील उड्डाणपूलाचे काम आयआरबी कंपनीने तत्काळ सुरू केले. पण भामरपाडा आणि शिरसाड या गावातील नागरिकांनी ये-जा करण्यासाठी भुयारी मार्गाची मागणी करून उड्डाणपूलाचे काम थांबवल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिरसाड हे वळण महत्त्वाचे असून पूर्ण वसई ग्रामीण, वाडा, भिवंडी या भागातील नागरिक याच ठिकाणाहून प्रवास करतात. त्यामुळे उड्डाणपूल तयार होण्यापूर्वी येथे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांचे बळीही गेले आहेत. शिरसाड येथे होत असलेल्या या अपघातांमुळे येथे नागरिकांनी आंदोलनही केले. (वार्ताहर)
> आय. आर. बी. कंपनीने उड्डाणपुलाचे काम सुरू केले पण ते काम आता रखडले आहे. भामटपाडा येथे भुयारी मार्ग असावा हेच हे काम ठप्प होण्याचे कारण आहे.
अपघाताची दाट शक्यता
> शिरसाड गावात नरेंद्र महाराजांचा मठ असल्यामुळे येथे रोज शेकडो भक्त येतात. तसेच त्यांची बैठक याच गावात होत असल्यामुळे शेकडो दासभक्त येथेच राहतात. पण भुयारी मार्ग नसल्यामुळे त्यांना हा महामार्ग ओलांडावा लागतो. परिणामी, अपघात होण्याचा धोका असून भामटपाडा येथे भुयारी मार्ग तयार केल्यास हा धोका कमी होऊ शकतो असे नागरिकांनी सांगितले.